वृत्तसंस्था
मुंबई – मुंबईत पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने डेंगी, मलेरियाच्या डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मुंबईत सप्टेंबर महिन्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये चारपट वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ मलेरियाचेही रुग्ण वाढले आहेत.Dengi increases in Mumbai very rapidly
१२ सप्टेंबरपर्यंत शहरात मलेरियाचे २१०, लेप्टोचे १८, गॅस्ट्रोचे ९२, कावीळचे १४; तर स्वाईन फ्ल्यूचे ६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत साथीच्या आजारांचे संकट कायम आहे.गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात डेंगीचे २१ रुग्ण सापडले होते; पण यावर्षी ही संख्या चार पटीने वाढून ८५ वर पोहोचली आहे.
सप्टेंबर महिन्यांच्या १२ दिवसांत मुंबईत २०० हून अधिक मलेरियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत मलेरियाचे अधिक रुग्ण सापडले असले, तरीही एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे ७५० रुग्ण सापडले होते;
तर या वर्षी २१० रुग्ण नोंदवले गेले आहेत. शहरात डेंगी, मलेरियापाठोपाठ लेप्टोचेही रुग्ण आढळत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लेप्टोचे ५७ रुग्ण आढळले होते. यंदा आतापर्यंत लेप्टोच्या १८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे सॅन्डहर्स्ट रोड, वरळी, प्रभादेवी, दादर आणि माहीम येथील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App