• Download App
    पाेलीस असल्याची बतावणी करुन तरुणाला डांबुन ठेवत खंडणीची मागणी |Demanding ransom by pretending to be Paelis and keeping the youth in suspense

    पाेलीस असल्याची बतावणी करुन तरुणाला डांबुन ठेवत खंडणीची मागणी ;सहा आराेपीं विराेधात गुन्हा दाखल, तीनजण अटकेत

    पुण्यातील चतुश्रृंगी मंदिरा समाेरुन जात असलेल्या एका टेम्पाे चालकाला कार मधून आलेल्या चारजणांनी तसेच माेटारसायकलवरील दाेघांनी अशा एकूण सहाजणांनी टेम्पाेला गाडया आडव्या लावून थांबवले. त्यानंतर सदर टेम्पाेचालकास पाच लाख रुपये खंडणी मागणी करुन त्याचे ओळखीच्या व्यक्तीकडून दाेन लाख रुपये घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.Demanding ransom by pretending to be Paelis and keeping the youth in suspense


    विशेष प्रतिनिधी

    पुणे –पुण्यातील चतुश्रृंगी मंदिरा समाेरुन जात असलेल्या एका टेम्पाे चालकाला कार मधून आलेल्या चारजणांनी तसेच माेटारसायकलवरील दाेघांनी अशा एकूण सहाजणांनी टेम्पाेला गाडया आडव्या लावून थांबवले. त्यानंतर सदर टेम्पाेचालकास पाच लाख रुपये खंडणी मागणी करुन त्याचे ओळखीच्या व्यक्तीकडून दाेन लाख रुपये घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाेलीसांनी सहा आराेपीं विराेधात गुन्हा दाखल केला असून तीन आराेपींना अटक केले आहे.Gas agency ex employee planning extortion..crime registered in chaturshingi police station

    याबाबत चतुश्रृंगी पाेलीसांकडे श्रीराम सुखराम भादु (वय-२८,रा.पिंपळेगुरव,पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आराेपी विकास बाबु काेडीतकर (वय-३०), सतिश सुधीर वांजळे (३३) व सुदर्शन किशर गंगावणे (२५, सर्व रा.पुणे) यांना अटक करण्यात आले असून त्यांच्यासह साथीदार मुकेश ऊर्फ मांगीलाल व इतर व्यक्तीं विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



    श्रीराम भादु हे टेम्पाे चालवत नेत असताना, आराेपींनी त्यांना रस्त्याच अडवून त्यांना ‘आम्ही क्राईम ब्रँच युनिट दाेनचे पाेलीस आहेत’ असे सांगितले. तुम्ही ब्लॅकने गॅस सिलेंडर विकता तुमच्यावर केस दाखल करावी लागेल, केस नकाे असेलतर पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले.

    पैसे दिले नाहीतर जेलची हवा खावी लागेल असे म्हणाले असता, तक्रारदार भादु याने आमच्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यावर आराेपींनी त्यास तुमचे हातपाय ताेडुन जिवे ठार मरुन टाकु असे म्हणून टेम्पाे चालक भादु व त्याचा साथीदार कैलाश यांना आराेपींनी त्यांचे कारमध्ये बसवून त्यापैकी तीघेजण कार मध्ये बसवून त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पैशाची मागणी करत त्यांना मारहाण केली.

    कैलाश याच्या खिशातून साडेचार हजार रुपये व माेबाईल अाराेपींनी काढून घेतले. त्यानंतर माेबाईलवरुन तक्रारदार यांचे नातेवाईक व ओळखीच्या लाेकांना फाेन करुन पैशाची मागणी करुन भवरलाल यांचेकडून दाेन लाख रुपये घेऊन सदर दाेघांना साेडून देत आराेपी पसार झाले.

    दरम्यान, संबंधित आराेपींना पूर्वी विश्वनाथ गॅस एजन्सीत काम करणारा व मालकांनी त्याला कामावरुन काढुन टाकलेला संशयित आराेपी मुकेश याने पाठविले असेल असा तक्रारदार यांचा संशय आहे. याबाबत चतृश्रृंगी पाेलीस पुढील तपास करत आहे.

    Demanding ransom by pretending to be Paelis and keeping the youth in suspense

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!