विशेष प्रतिनिधी
पुणे : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. गेली २ वर्ष सातत्याने कोविड निर्बंध असल्याने हा उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. या वर्षी रुग्णसंख्या मर्यादित असल्याने शिवजयंती उत्साहात साजरी व्हावी अशी सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे. Demand for permission for Shiv Jayanti procession
यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पुणे शहरात शिवजयंती उत्सवास व मिरवणुकीस परवानगी मिळावी, अशा आशयाचे निवेदन दिले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख,शिवजयंती उत्सव समितीचे अमित गायकवाड उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App