पुलावरुन नदीत उडी मारलेल्या डिलीव्हरी बाॅयचा मृत्यु

कौटुंबिक वादातून पुण्यातील बंडगार्डन पुलावरून नदीत उडी मारलेल्या डिलीव्हरी बाॅयचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.


प्रतिनिधी 

पुणे –पुण्यातील येरवडा परिसरातील बंडगार्डन पुलावरुन डिलीव्हरी बाॅयचे काम करणाऱ्या एका तरुणाने नदीत उडी मारल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला हाेता. त्यानंतर सदर तरुणास पाण्याबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली अाहे. सुनिल वसंत म्हसके (वय-३१,रा.जयप्रकाशनगर, येरवडा,पुणे) आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. काैटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पाेलीसांनी वर्तवला आहे. Delivery Boy succide case at Bandgardan Bridge

याबाबत येरवडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन येथील नवीन पुलावरुन एका इसमाने नदीत उडी मारल्याची माहिती पाेलीसांच्या नियंत्रण कक्षास मिळाली हाेती. त्यानुसार येरवडा पाेलीसांचे पथक घटनास्थळी जाऊन त्यांनी नदीपात्रात शाेध घेऊन अग्नीशामक दलाच्या जवानांच्या मदतीने नदीतून त्याला निपचित अवस्थेत बाहेर काढले.



सदर तरुणाच्या शर्टाचे खिशातील आधारकार्डमुळे त्याचे नाव सुनील म्हसके असल्याचे स्पष्ट झाले. पाेलीसांनी त्याला रुग्णावाहिकेतून ससून रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे घाेषित केले. याबाबत पुढील तपास येरवडा पाेलीस करत आहे.

Delivery Boy succide case at Bandgardan Bridge

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात