विशेष प्रतिनिधी
मुंबई : कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण शुल्क (फी) कपातीबाबत जीआर काढला आहे. पण, त्याबाबतचा अध्यादेश काढला नसल्याची जोरदार टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे- पवार सरकारवर केला.Deduction of tuition fees of school, colleges The government’s only GR
अध्यादेश काढण्याऐवजी केवळ शिक्षण शुल्क (फी) कपातीबाबतचा जीआर काढून ठाकरे पवार सरकारने मंत्रिमंडळातल्या शिक्षक सम्राट यांच्यासमोर गुडघे टेकले आहेत. गेल्या वेळेला या संदर्भामध्ये जयंत पाटलांचे नाव आलेलं होतं.या वेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या मंत्र्यांनी आदेश काढण्यासाठी विरोध केला. त्यांची नाव मुख्यमंत्र्यांनी पटापट घ्यावीत, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App