• Download App
    महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा कळस, पण महाविकास आघाडीकडून चोराच्या उलट्या बोंबा, नारायण राणे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल|Corruption peaks in Maharashtra, Narayan Rane's attack on Uddhav Thackeray

    महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा कळस, पण महाविकास आघाडीकडून चोराच्या उलट्या बोंबा, नारायण राणे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा,असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव यांच्यावर केला आहे. आगे आगे देखिए होता है क्या असा इशाराही त्यांनी दिला आहे.Corruption peaks in Maharashtra, Narayan Rane’s attack on Uddhav Thackeray

    नारायण राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्यांच्या नशिबी आत्महत्या. आप्तांच्या तिजोºयांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्ती कोठून आली? कोणाकडून आणली?



    शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच!भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, थेट मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई झाली आहे. आता मुख्यमंत्री कशासाठी थांबलेत, त्यांनी राजीनामा द्यावा. आतापर्यंत आम्ही सगळीकडे त्यांचे नाव ऐकत होतो.

    ते आता सिद्ध झाले आहे. तो पैसा काही त्यांच्या घरापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. ते भुयारी गटार थेट मातोश्रीपर्यंत जाते. त्यामुळे आता मातोश्रीने उत्तर द्यायला हवे, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावे. सचिन वाझे आणि हे पैसे कुठे कुठे फिरत आहेत हे आता समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नैतिक दृष्टीकोनातून राजीनामा द्यावा.

    Corruption peaks in Maharashtra, Narayan Rane’s attack on Uddhav Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!