• Download App
    Congress unleashing a barrage of criticism, officials gravitated towards the Sangh—but only after the BJP came to power! काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Congress

    नाशिक : काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ, हेच राजकीय वास्तव भाजप सत्तेवर आल्यानंतर समोर आले.Congress unleashing a barrage of criticism, officials gravitated towards the Sangh—but only after the BJP came to power!

    नागपूरच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी विश्वास नांगरे पाटलांनी हिंदू संमेलनामध्ये भाषण करून संघाची आणि संघ संस्थापकांची स्तुती केली. त्यावरून महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांच्या ते टार्गेटवर आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा विश्वास नांगरे पाटलांवर टीकेची झोड उठविली. पण त्याचवेळी चंद्रकांतदादा पाटलांसारखे मंत्री नांगरे पाटलांच्या मदतीला आले त्यांनी नांगरे पाटलांना संघात येण्याची ऑफर देऊन टाकली. संघ देशद्रोही नसल्याचे सुद्धा त्यांनी सर्टिफिकेट दिले



     राजकीय वास्तव

    पण त्याहीपेक्षा एक अत्यंत महत्त्वाचे राजकीय वास्तव मध्य प्रदेश मधले मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी एका जाहीर भाषणातून सांगितले. सध्या अधिकाऱ्यांमध्ये संघाशी संबंध जोडण्याची ओढ लागली आहे. आपण स्वयंसेवक होतो. आपण शाखेवर जात होतो. आपले वडील संघाचे स्वयंसेवक होते ते सुद्धा संघाच्या शाखेवर जात होते, असे अनेक अधिकारी आता आपल्याला भेटून सांगत असल्याचे कैलास विजयवर्गीय म्हणाले. पण हेच अधिकारी भाजप सत्तेवर नव्हता, तेव्हा संघ शाखेवर जात असल्याचे किंवा संघाचे स्वयंसेवक असल्याचे सांगत नव्हते, या मुद्द्यावर विजयवर्गीय यांनी नेमकेपणाने बोट ठेवले. भाजप सत्तेवर आल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांना संघ आठवला. संघाशी आपले जुने संबंध आठवले. ते त्यांना सगळ्यांना सांगावेसे वाटले, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे कैलास विजयवर्गीय यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी संघाने आणि भाजपने अशा अधिकाऱ्यांपासून सावध राहावे, असा सल्ला सुद्धा त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाला दिला.

    – सत्तेवरच्या पक्षाशी निष्ठा

    कुठलेही सरकारी अधिकारी सत्तेवर असलेल्या पक्षाशी निष्ठा दाखवून आपली कामे साधून घेतात. आज भाजप सत्तेवर आहे म्हणून अनेक अधिकाऱ्यांना आपले जुने संघाचे संबंध आठवले. विश्वास नांगरे पाटलांसारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा संघाच्या व्यासपीठावर जावेसे वाटले, पण काँग्रेसची राजवट असताना अशाच सनदी अधिकाऱ्यांना काँग्रेसची तळी उचलून धरावीशी वाटली होती. लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे यांच्यासारख्या साहित्यिक सनदी अधिकाऱ्यांना काँग्रेसी राजवट चांगली वाटत होती, पण मोदींची राजवट वाईट आहे, असे सांगताना त्यांनी “साहित्यिक” भाषा वापरली होती. राजा तू चुकलास असे ते मोदींना उद्देशून म्हणाले होते. पण याच साहित्यिक सनदी अधिकाऱ्यांना काँग्रेसी राजवटीतल्या चुका कधी दिसल्या नव्हत्या. त्यावेळचा राजा कधी चुकलेला त्यांना आढळला नव्हता. श्रीनिवास पाटील, प्रभाकर देशमुख यांच्यासारख्या सनदी अधिकाऱ्यांना शरद पवारांचा पक्ष जवळ वाटला होता. त्यांना भाजपकडूनही राजकीय फायदे उपटण्यात अडचण वाटली नव्हती. पण विश्वास नांगरे पाटील संघाच्या व्यासपीठावर गेले, त्यामुळे त्यांना टार्गेट करायला काँग्रेसचे नेते आणि ठाकरे बंधू पुढे आले. त्यापेक्षा वेगळे काही घडले नाही.

    Congress unleashing a barrage of criticism, officials gravitated towards the Sangh—but only after the BJP came to power!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या आजपर्यंत कधी खऱ्या ठरल्यात का??, तेव्हा इथून पुढे….

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा