उद्धव ठाकरे भाषण : सावरकरांचा धडा रद्द केला म्हणून काँग्रेसचा तोंडी निषेध, पण जाहिरातीवरून फडणवीस टार्गेट!!

प्रतिनिधी

मुंबई : सावरकरांचा धडा कर्नाटक सरकारने रद्द केला म्हणून तोंडी निषेध, पण महाराष्ट्रातल्या जाहिरातीवरून देवेंद्र फडणवीसच टार्गेट, असे आजच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे राजकीय सार होते. Congress protested verbally for canceling Savarkar’s lesson, but Fadnavis was targeted by advertisements

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वरळीत घेतलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या भाषणात बाकी बहुतेक सगळे जुनेच मुद्दे होते. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना ठाकरे पिता-पुत्र मुंबईवर काँग्रेसचे केंद्रातले नेते अतिक्रमण करीत आहेत, असा आरोप करत असायचे. केंद्रातून काँग्रेसचे सरकार गेले आणि भाजपचे सरकार आले. त्यामुळे आता ठाकरे पिता पुत्र भाजपवर मुंबईत अतिक्रमण केल्याचा आरोप करतात. तोच आरोपात उद्धव ठाकरेंनी रिपीट केला.



सावरकरांच्या मुद्द्यावर देखील काँग्रेस वारंवार अपमान करूनही उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत नेहमीच काँग्रेसचा निषेध करतात. तसाच तोंडी निषेध आजही केला.

कर्नाटकात काँग्रेस सरकारने सावरकरांचा धडा अभ्यासक्रमातून वगळला. हेडगेवार यांच्या धड्यालाही बाहेरची वाट दाखवली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा जुन्याच पद्धतीने नुसता तोंडी निषेध केला. पण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. देवेंद्र फडणवीस यांची सध्या सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था आहे, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.

देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्याच शैलीत “बचावात्मक आक्रमण” असे प्रत्युत्तर दिले. सावरकरांचा धडा वगळल्याबद्दल काँग्रेसचा तोंडी निषेध आणि प्रत्यक्षात जाहिरातीच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस टार्गेट असेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे स्वरूप राहिले.

Congress protested verbally for canceling Savarkar’s lesson, but Fadnavis was targeted by advertisements

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात