नाशिक : आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या अध्यक्षांना आज अचानक माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आठवण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वकर्मा यांच्यावर विश्वासघाताचा आरोप करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आठवण काढली.Congress President remembers Manmohan Singh during Assam campaign; accuses Modi of betrayal!!
काँग्रेसच्या राजवटीत मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी आसाम आणि ईशान्य भारताच्या विकासासाठी भरपूर काम केले. त्यांनीच आसामला आणि ईशान्य भारताला विकासाची नवी ओळख करून दिली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आसामच्या जनतेसाठी काम केले नाही, तर आसामी जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
– एरवी फक्त गांधी परिवाराची आठवण
मल्लिकार्जुन खर्गे बाकीचे भाषण भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याचा खर्ची झाले, पण त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य हेच, की त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आठवण काढली. एरवी काँग्रेसचे अध्यक्ष किंवा काँग्रेसचे बाकीचे नेते गांधी परिवारातील नावे सोडून इतर काँग्रेसच्या कर्तृत्व नेत्यांची नावे क्वचितच घेतात. काँग्रेसची राजवट म्हटल्यावर त्यांना फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हेच आठवतात. लालबहादूर शास्त्री, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग हे सुद्धा काँग्रेसनेच दिलेले पंतप्रधान होते, याची आठवण सुद्धा अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांना होत नाही.
– कामाराजांच्या राजवटीची काढली होती आठवण
पण 2021 मधल्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रथमच कामराज यांच्या राजवटीची आठवण काढली होती. तामिळनाडूतील जनतेने काँग्रेसला बहुमत दिले, तर कामराज यांच्या राजवटीसारखी कल्याणकारी राजवट तामिळनाडूला देऊ, असे आश्वासन काँग्रेसने आणि राहुल गांधींनी दिले होते. पण तामिळनाडूच्या जनतेने काँग्रेस आणि राहुल गांधींच्या आश्वासनाला प्रतिसाद दिला नव्हता.
– मनमोहन सिंग आसाम मधून राज्यसभेत
तेलंगणा मधल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या नेत्यांनी नरसिंह राव यांची सुद्धा आठवण काढली होती, तर आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आसाम मध्ये मनमोहन सिंग यांची आठवण काढली. मनमोहन सिंग हे पंतप्रधान पदावर असताना त्यांना काँग्रेसने आसाम मधूनच राज्यसभेवर निवडून आणले होते. त्यामुळे ते संसदेत आसामचे लोकप्रतिनिधी होते. हेच राजकीय औचित्य साधून मल्लिकार्जुन खर्गे यांनी मनमोहन सिंग यांची आठवण काढली. आता या आठवणीचा आसाम मध्ये काँग्रेसला किती फायदा होईल??,हे विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधूनच स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App