विशेष प्रतिनिधी
पुणे : सीएनजीचे दर आज मध्यरात्रीपासून पुणे शहरात ६८ रुपये प्रति किलोवरून ७३ रुपये प्रति किलोपर्यंत वाढणार आहेत. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट वायूच्या आयातीच्या किंमतीत वाढ झाली. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विशिष्ट गॅसची आंतरराष्ट्रीय किंमत दुप्पट झाली आहे.CNG in Pune from Rs 68 per kg to Rs 73
परिणामी सीएनजीच्या दरात वाढ झाली, असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
पुण्यात बुधवारपासून सीएनजीची किंमत ६८ रुपये प्रति किलो झाली होती. सरकारने १ एप्रिल रोजी नैसर्गिक वायूवरील व्हॅट १३.५ % वरून ३ % पर्यंत कमी केला. त्यामुळे ६२.२० रुपये किलो दर होता. त्यावरून ७.८० रुपयांची वाढ झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App