CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- दादा म्हणजे लाभू न शकलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री, विधिमंडळात अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर सर्वच भावुक

CM Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Fadnavis राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी शोकाकुल वातावरण पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. त्यात ते म्हणाले की, अजितदादांच्या रूपाने मी एक जवळचा मित्र गमावला. अजित पवार म्हणजे महाराष्ट्राला लाभू न शकलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची पूर्ण क्षमता होती. नियतीने कधीतरी त्यांचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण केले असते.CM Fadnavis

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दादांच्या जाण्याने मी माझा मोठा भाऊ गमावला आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, कुणाची नजर लागली माहिती नाही, पण नियतीने आपला एक नेता हिरावून नेला. या शोकप्रस्तावावर विधान परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वर्षांपूर्वी अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याचा थेट उल्लेख न करता उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणावरही जीव नकोसा होईल एवढे आरोप करू नका. भाजपला लक्ष्य करत रोहित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी हे दादांवरील बिनबुडाचे आरोप एका गाठोड्यात भरून समुद्रात फेकून द्यावेत हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.CM Fadnavis



७० हजार कोटींच्या आरोपांना कामातून उत्तर दिले : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी सांगितले की, ७० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतरही ते खचले नाहीत. दुसऱ्या कुणीही आत्महत्या केली असती, पण त्यांनी कामातून उत्तर दिले. कोरोनाकाळात कर्जमाफी तसेच शिवभोजन योजनाही त्यांनी राबवून दाखवली. त्यांच्या टेबलावरची मांडणी काटकोनात असायची. तशीच शिस्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती.

दादांनी तिजोरीचा समतोल कधीही ढळू दिला नाही : एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अजितदादांनी ‘एकनाथराव मुख्यमंत्री होत असतील तर आमची हरकत नाही,’ असे सांगत मोठेपण दाखवले होते. लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करताना त्यांनी राज्याच्या तिजोरीचा समतोल ढळू दिला नाही.

ही नियतीची पद्धत आहे का अशी शंका येते : जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले की, राजकारणाला नजर लागली आणि दादांसारखा नेता आपल्यातून गेला. महाराष्ट्र राज्यात मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे बघितले जाते त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का, अशी शंका येते.

CM Fadnavis Condolence Motion Ajit Pawar Death Assembly VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात