…अन् मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ कृतीने भारावून गेलेल्या पिता-पुत्राच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

अचानक मुख्यमंत्र्यांचे लक्ष व्हिलचेअरवर बसलेल्या संदेशकडे गेले आणि त्यानंतर काय घडले जाणून घ्या

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जव्हार येथून मंत्रालयात आलेल्या बांधकाम मजूर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या संदेश पिठोले या तरूणाला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा पाच लाखांचा धनादेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या वागणुकीने भारावून गेलेल्या संदेशच्या आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. Chief Minister Eknath Shinde helped a disabled youth with Rs 5 lakhs

मुख्यमंत्री शिंदे मंत्रालयातील त्यांच्या दालनात असताना लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिक त्यांच्या भेटीसाठी आले होते, या गर्दीत पालघर जिल्ह्यातील जव्हारचा संदेश पिठोले त्याच्या वडिलांसह मुख्यमंत्र्यांना भेटायला आला होता. अचानक मुख्यमंत्र्यांचे लक्ष व्हिलचेअरवर बसलेल्या संदेशकडे गेले. विधी व न्याय विभागाच्या आढावा बैठकीसाठी जात असताना मुख्यमंत्र्यांनी संदेशजवळ थांबून त्याची विचारपूस केली आणि ते बैठकीस गेले, बैठक संपताच त्यांनी संदेशला बोलावले. त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी संदेशला तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सबंधित अधिकाऱ्यांना बोलावले, तत्काळ संपूर्ण प्रक्रिया झाली. धनादेशावर संबंधित अधिकाऱ्यांनी तिथेच मुख्यमंत्र्यांसमोरच स्वाक्षरी केली आणि अवघ्या काही मिनिटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदेशच्या हातात पाच लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.

शिवाय संदेशला कृत्रिम पाय, हात बसविण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे यांना समन्वय करण्याच्या सूचनाही दिल्या. व्यवसायासाठी स्टॉल सुरू करण्याकरिता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने पालघर येथे जागा देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Chief Minister Eknath Shinde helped a disabled youth with Rs 5 lakhs

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात