विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhagan Bhujbal आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता महाराष्ट्रातील गॅस पुरवठ्यावर दिसू लागला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी मदतीसाठी राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले. मात्र, सध्या जगभरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्यावर तातडीने उपाय करणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.Chhagan Bhujbal
सध्या शहरांमध्ये अनेक हॉटेल्सकडे उरलेल्या गॅस साठ्यावरच व्यवसाय सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या दोन दिवसांत जवळपास 20 टक्के हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, गॅसचा तुटवडा असल्याची वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. मात्र, सध्या जगभरात अस्थिरता आहे. पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे हे सर्वांनाच माहिती आहे. केंद्र सरकारने राज्य सरकार तसेच गॅस उत्पादक कंपन्यांना पत्र पाठवून एलपीजी गॅस निर्मिती वाढवण्याचे आदेश दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.Chhagan Bhujbal
केंद्र सरकारने सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत. हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांसारख्या अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने गॅस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना तातडीने मदत करणे कठीण असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पर्याय म्हणून हॉटेल्सनी केरोसिनचा वापर करण्याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र अनेक हॉटेल व्यावसायिकांनी त्यासाठी त्यांच्या यंत्रणा बदलाव्या लागतील, असे सांगितल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.
दरम्यान, गॅस सिलिंडरचा काळाबाजार होऊ नये यासाठी सरकारने प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना प्रत्येक विक्रेत्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणताही विक्रेता बेकायदेशीर साठा करत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सध्याची परिस्थिती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या संकटाचा परिणाम असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
सिलिंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा
दुसरीकडे गॅस तुटवड्याच्या भीतीमुळे नागरिकांमध्येही अस्वस्थता वाढताना दिसत आहे. कोल्हापूरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. अतिरिक्त गॅस साठा करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सोलापुरातील रामवाडी परिसरातही गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. इराण-इस्त्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस मिळणार की नाही या भीतीमुळे अनेक ग्राहक ‘पॅनिक बुकिंग’ करत असल्याने ऑनलाईन बुकिंग प्रणालीवरही ताण आला असून काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App