चांद्रयान मोहिमेला प्रकाश राज यांनी टोकले; नेटीझन्सनी अभिनेत्याला धू धू धुतले!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : चांद्रयान मोहिमेला प्रकाश राज यांनी टोकले, नेटीझन्सी अभिनेत्याला धू धू धुतले. असे आज घडले. चांद्रयान 3 दोनच दिवसांमध्ये चंद्रावर उतरणार असताना अभिनेता प्रकाश राज यांनी चांद्र यान मोहिमेची खिल्ली उडवली. भारतीय अवकाश विकास संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचे एक व्यंगचित्र शेअर करून प्रकाश राज यांनी त्यांना चहावाला दाखवले आणि एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि के. सिवन यांची खिल्ली उडवली.Chandrayaan mission was launched by Prakash Raj; Netizens bashed the actor!!



त्यामुळे देशा परदेशातले नेटीझन्स प्रचंड चिडले आणि त्यांनी प्रकाश राज यांना सोशल मीडियावर धू धू धुतले. रशिया चीन यांच्यासारख्या विकसित देशांच्या चंद्र मोहिमा अपयशी ठरत असताना भारताची चांद्र मोहीम यशस्वी ठरते आहे. यामुळे प्रकाश राज यांना पोटदुखी झाल्याचे शरसंधान अनेकांनी साधले आहे.

या माणसाला भारताचे चांगले घडलेले काही बघवतच नाही, असे दुसऱ्याने स्पष्ट म्हटले आहे. भारताने तुटपुंज्या साधनांच्या आधारे आपली चांद्र मोहीम यशस्वी केली. याचा समस्त भारत यांना अभिमान वाटतो. पण केवळ मोदी द्वेषामुळे हा माणूस आंधळा झाला आहे, अशी टीका तिसऱ्या व्यक्तीने केली. प्रकाश राज यांनी चांद्र मोहिमेवर केलेली टीका अशा पद्धतीने अंगलट आली.

अनेक अडचणी पार करून भारताने विकास साधला. पण प्रकाश राज यांच्यासारख्या व्यक्तीला तो विकासही बघवत नाही, असे टीकास्त्र अनेकांनी सोडले आहे.

Chandrayaan mission was launched by Prakash Raj; Netizens bashed the actor!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!