उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता; आजपासून चार दिवस जोरदार वृष्टी, अलर्ट जारी

वृत्तसंस्था

मुंबई : उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून आजपासून काही भागात चार दिवस जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. Chance of rain in North Maharashtra and Vidarbha; Heavy rain for four days from today, alert issued

राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून ऐन थंडीतही पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच अजूनही पावसाचा रोख थांबलेला नसून ६ जानेवारीपासून काही भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
राज्यात ऐन थंडीच्या दिवसात पुढील चार दिवसात विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यात ६ ते ९ जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.



सहा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. या भागात काही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचाही जोर वाढणार आहे.

Chance of rain in North Maharashtra and Vidarbha; Heavy rain for four days from today, alert issued

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात