आफ्रिकेतून भारतात होणारी विमान वाहतूक रद्द करावी ; राजेश टोपे यांची केंद्र सरकारकडे मागणी

 

आफ्रिकेत कोविड १९ चा करोना विषाणूचा एक नवा व्हेरियंट B.1.1.529 आढळल्यानंतर जगभर खळबळ उडाली.Cancel flights from Africa to India; Rajesh Tope’s demand to the Central Government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मागील दोन वर्षापासून जगभरात कोरोनाने चांगलच थैमान घातलं होत.दरम्यान सध्या हळूहळू परिस्थिती आटोक्यात आली होती. सगळे निर्बंध शिथिल करण्यात आले होते.दरम्यान आता या कोरोनाच्या संकटात मोठी भर पडली .ती म्हणजे आफ्रिकेत कोविड १९ चा करोना विषाणूचा एक नवा व्हेरियंट B.1.1.529 आढळल्यानंतर जगभर खळबळ उडाली. दरम्यान या पार्श्वभुमीवर दक्षिण आफ्रिकेतून भारतात होणारी विमानवाहतूक बंद करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

नवा व्हेरियंट समोर आल्यानंतर तज्ज्ञांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर कोविड संक्रमण तेजीनं फैलावण्याचा धोका वर्तवण्यात आलाय. नव्या व्हेरियंटमुळे कोविड लस निष्काम ठरू शकते, असा इशाराही तज्ज्ञांनी दिलाय. या नव्या व्हेरियंटचा संक्रमण दर अत्यंत वेगवान असल्यानं रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं विकसित होऊ शकतात.नव्या व्हेरियंटमुळे जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली आहे, तोच आफ्रिकेतून नव्या व्हेरीयंटची बातमी समोर आली आहे. दरम्यान भारतात या व्हेरीयंटचा अजून एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र व्हेरीयंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून भारतात होणारी विमान वाहतूक रद्द करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.

Cancel flights from Africa to India; Rajesh Tope’s demand to the Central Government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात