वृत्तसंस्था
मुंबईः विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. परंतु भाजपने पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. तसेच मुख्यमंत्रीसुद्धा अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. BJP’s agitation on the steps of the legislature; Discussion of CM’s absence; They will come when they think it is right: Aditya Thackeray
त्यावर आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकदम बरे आहेत. त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते येतील.
अजित पवारांनी मुख्यमंत्री आज उपस्थित राहणार असल्याचे काल सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांची तब्येत उत्तम आहे. मुख्यमंत्री वर्षावर आले होते. विधिमंडळासह वरच्या आणि खालच्याही सभागृहात आले होते.
आता आम्ही सर्व मंत्री उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची बैठक ही ९ वाजता विधिमंडळात घेण्यास सांगितली, असेही अजित पवार म्हणाले होते.परंतु, मुख्यमंत्री केव्हा उपस्थित राहणार याकडे सदस्यांचे लक्ष आता लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App