‘’… काढला नसता आमचा बाप, तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप!’’

Sanjay Raut Denies meetgin With Ashish Shelar Says Maharashtra politics is not like India-Pakistan relation

आशिष शेलारांनी संजय राऊतांच्या टीकेला दिले जोरदार प्रत्युत्तर; “जाणता राजा हरला नाही, तर तो…’’ असंही म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात सध्या नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू आहेत. तीन दिवसांपूर्वी मोठा राजकीय महाभूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाबंडखोरी झाली. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या ३० पेक्षा अधिक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. एवढचं नाहीतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि अन्य आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिवाय काल दोन्ही गटाचे मेळावेही पार पडले. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सातत्याने शरद पवारांचे समर्थन आणि भाजपावर टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला भाजपा आमदार आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे. BJP MLA Ashish Shelars reply to Sanjay Rauts criticism

आशिष शेलार म्हणतात, ‘’…या प्रस्तुत प्रसंगी “जाणता राजा” हरला नाही, तर तो जिंकला… हे सांगण्यासाठी दरबारी राजकारणात “भाट” ठेवलेले असतातच… वेगवेगळ्या “माध्यमातून” भाट आपलं काम चोख करीत आहेत.  विश्वविख्यात प्रवक्ते आणि शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की, हा तर दिल्लीचा डाव..? आमचं पुन्हा पुन्हा एकच म्हणणं  जर विश्वविख्यातांनी काढला, नसता आमचा बाप तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप!’’ असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

याशिवाय,’’विश्वविख्यात प्रवक्त्यांचा धसका आता नाना पटोलेंच्या काँग्रेसने घेतलाय म्हणे. कृपया काँग्रेसवर काही बोलू,लिहू नका असा निरोप त्यांनी धाडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. उबाठा आणि “जाणता राजांच्या”  कार्यकर्त्यांनी तर विश्वविख्यातांचा एवढा धसका घेतलाय की ते सकाळी टिव्हीच बंद ठेवतात. आम्ही फक्त एवढेच म्हणू शकतो.’’ असंही आशिष शेलार यांनी या अगोदर म्हटलं होतं.

याशिवाय ‘’अहंकारी राजा आणि पुत्र विलासी दिमतीला ठेवला शापित दरबारी अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी अहंकारी राजाला आवडे खोटी स्तुती भारी संजय मग बिनधास्त दुसऱ्याचे बाप काढी काय ती रोज सुरु असायची सरबराई! बघा काय अवकळा आली गेली गेली सत्ता गेली, पक्ष ही गेला अहंकारी राजा, विलासी पुत्र आणि संजय तेवढा उरला झाला मोह “जाणत्या राजांना” याच संजयाचा अखेर बसला फटका त्यांनाही शापित दरबाऱ्याचा आम्ही सांगतं होतो वारंवार यांना आवरा कि हो, या तुमच्या विश्वविख्यातांना आता बांधा पुतळा या तुमच्या विश्वविख्यातांचा यापेक्षा काय सन्मान करणार या शापित दरबाऱ्यांचा!’’ असं कविता सादर करतही आशिष शेलारांनी टीका केली होती.

BJP MLA Ashish Shelars reply to Sanjay Rauts criticism

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub