• Download App
    Bhujbal Retorts Sharad Pawar Reservation Meeting आता सामंजस्यबद्दल बोलणारे पवार तेव्हा बैठकीला का आले नाहीत?

    Bhujbal : आता सामंजस्यबद्दल बोलणारे पवार तेव्हा बैठकीला का आले नाहीत?, भुजबळांचा पलटवार

    Bhujbal

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : Bhujbal  आरक्षण प्रश्नावर सामंजस्य हवे असे सांगणारे शरद पवार दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला का आले नाही, असा सवाल ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.Bhujbal

    ओबीसी मेळाव्यासाठी आलेले भुजबळ म्हणाले की, सर्वपक्षीय बैठकीची सूचना शरद पवारांनीच केली होती. उद्धव ठाकरे सरकारमध्येही मराठा समिती होती. मार्गदर्शक शरद पवारच होते. त्या समितीत अजित पवार, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण होते. त्या वेळी मराठा समाजासाठी समिती नेमण्याची गरज होती काय, असे पवार बोलले नाही.Bhujbal



    दगडफेकीआधीच्या बैठकीला शरद पवारांचा आमदार होता

    भुजबळ म्हणाले, जरांगेंच्या सप्टेंबर २०२३ मध्ये आंतरवाली सराटीतील आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग होता. जरांगेंशी बोलायला पोलिस गेले तर सकाळी बोलू, असे सांगितले. रात्री झालेल्या बैठकीस शरद पवारांचा एक अामदार उपस्थित होता. सकाळी पोलिस आल्यावर तुफान दगडफेक झाली. महिला पोलिसांना मारहाण झाली. ८४ जण जखमी झाले. शरद पवारांनी असे का झाले असे विचारायला हवे होते. पवार व उद्धव ठाकरे तेथे गेले म्हणून हा बाबा (जरांगे) मोठा झाला.

    पवारांची दुहेरी भूमिका चालणार नाही

    ओबीसी आणि मराठा समाजासाठी वेगवेगळ्या दोन उपसमित्या स्थापन करण्याची गरज होती का, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला आहे. “राज्य सरकारने दोन समाजांसाठी दोन उपसमिती नेमल्या आहेत. या दोन वेगवेगळ्या जातींच्या समित्या आहेत. एका जातीची समिती असेल तर तिथे दुसऱ्या जातीच्या समितीचा विचार होणार का? सरकारने सामंजस्य निर्माण करून दोघात एकता करायला पाहिजे होती. रास्त मागण्यांची पूर्तता कशा पद्धतीने करता येईल, यासाठी सर्वांनी पाऊल टाकले पाहिजे, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले होते. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी दुहेरी भूमिका चालणार नाही असे स्पष्ट केले.

    आम्ही आरक्षण वाचवण्यासाठी झगडत आहोत

    आमच्यामध्ये आणखी मंत्री टाका. आम्ही आमचे आरक्षण वाचवण्यासाठी झगडत आहोत आणि मराठ्यांना इथे ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण असतानाही त्यांना ओबीसीमध्ये वेगळे पाहिजे. यावरही पवारांनी बोलले पाहिजे. त्या वेळी एक भूमिका आणि या वेळी वेगळी भूमिका असे चालायचे नाही, असे ते म्हणाले.

    Bhujbal Retorts Sharad Pawar Reservation Meeting

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Lakshman Hake : मनोज जरांगे यांनी दिल्ली नाही,‎ तर अमेरिकेत गेले पाहिजे‎; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची खोचक टीका

    Manoj Jarange : मनोज जरांगेंची गोलमेज परिषदेवर टीका‎;16% आरक्षणाची श्वेतपत्रिका‎ काढायला लावणार

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!