• Download App
    Manoj Jarange Patil Criticizes Roundtable Conference मनोज जरांगेंची गोलमेज परिषदेवर टीका‎;16% आरक्षणाची श्वेतपत्रिका‎ काढायला लावणार

    Manoj Jarange : मनोज जरांगेंची गोलमेज परिषदेवर टीका‎;16% आरक्षणाची श्वेतपत्रिका‎ काढायला लावणार

    Manoj Jarange

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Manoj Jarange  मराठा समाज संपूर्ण देशात‎ विखुरलेला आहे. त्यामुळे लवकरच ‎करोडो समाजबांधवांना घेऊन ‎दिल्लीला जाणार असल्याचे मनोज‎‎ जरांगे पाटील यांनी‎‎ सांगितले. गुरुवारी‎‎ते आंतरवाली‎‎ सराटी येथे‎‎ माध्यमांशी बोलत‎‎ होते. हैदराबाद‎‎ गॅझेट विरोधातील‎‎ याचिका‎ फेटाळल्यानंतर त्यांनी न्यायालयाचे‎ आभार मानले. न्यायदेवता‎ गोरगरिबांसाठी काम करते. देशात‎ लोकशाही जिवंत आहे, असे जरांगे‎ यावेळी म्हणाले.‎Manoj Jarange

    याप्रसंगी मनोज जरांगे पाटील‎ यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ‎‎शरसंधान साधले. येवल्याचा ‎‎अलिबाबा दोन आरक्षण खात आहे. ‎‎त्यामुळे १६ टक्के आरक्षणाची‎ श्वेतपत्रिका काढायला लावणार ‎आहे, असे जरांगे म्हणाले. भुजबळ‎ लोकांची भाजी चोरून आणून‎ विकत होते. त्यांना आता लवकरच‎ तुरुंगात जावे लागेल, असे जरांगे‎ म्हणाले.‎Manoj Jarange



    बंजारा समाजाच्या उपोषणाला‎ मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली‎ नाही. त्यावर जरांगे यांनी टीका‎ केली. त्यांच्या समस्येकडे लक्ष न‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ देणे कितपत योग्य आहे, असा‎ सवाल जरांगे यांनी केला. दरम्यान,‎ सरकारमधील काही लोकप्रतिनिधी‎ जातीवाद करीत आहेत. ते जर‎ सरकारमध्ये राहून जातीचे काम‎ करत असतील, तर आमच्या‎ नेत्यांनीही जातीचे काम करायला‎ काय हरकत आहे. लवकरच‎ आम्ही सर्वपक्षीय मराठा नेत्यांची‎ बैठक घेऊ, असेही मनोज जरांगे‎ पाटील यांनी सांगितले.‎

    गोलमेज परिषदेवर टीका‎

    कुणी काय करावे आणि काय करू‎ नये हे आजकाल अवघड झाले‎ आहे. ज्यांना जे करायचे आहे ते करू‎ द्या. जेव्हा वेळ होती तेव्हा ते आले‎ नाहीत. वेळ गेल्यावर असे काही‎ उकरून काढायचे, त्यावर मी काही‎ बोलणार नाही. काहींचे दुकाने बंद‎ पडत आहेत. काही, माना-पानाला‎ भुकेलेले आहेत. काही तरी पिल्लू‎ उकरून काढायचे आणि स्वत:ला ‎खूप हुशार समजायचे. मग तेव्हा का‎ आले नाहीत, अशा शब्दात जरांगे‎ पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे‎ गुरुवारी झालेल्या गोलमेज परिषदेवर‎ टीका केली. समाजातील गरीब‎ मराठ्यांना वर कसे नेता येईल याकडे‎ आम्ही लक्ष देण्याचे ठरवले आहे.‎ समाज उघड्या डोळ्याने सगळे‎ बघत आहे, असे जरांगे यावेळी‎ म्हणाले.‎

    Manoj Jarange Patil Criticizes Roundtable Conference

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे निधन

    राज्याची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची पण राज्य कुठेही दिवाळखोरीकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    निलंबित टीएमसी आमदार हमायून कबीर एआयएमआयएम सोबत आघाडीची घोषणा; बंगाल निवडणुकीत ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचा दावा