बारामती PDCC बँक रात्री उघडण्याचे “पवार संस्कारितांचे” प्रताप; पण माळेगाव कारखान्याच्या मतदार यादीबाबत बँक मॅनेजरचे कानावर हात!!

Malegaon factory

विशेष प्रतिनिधी

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतली PDCC बँक रात्री 11.00 वाजता उघडली. त्यावरून काका – पुतण्यांमध्ये वाद उसळला. पण तिथे माळेगाव कारखान्याची मतदार यादी कशी आली?, याबद्दल बँक मॅनेजरने कानावर हात ठेवून तो मोकळा झाला. सहकार पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी याबद्दल संताप व्यक्त करून निवडणुकीतला “पवार संस्कारितांचा” गैरप्रकार उघडकीस आणला‌. अजित पवारांचे पीए सुनील मुसळे आमच्यासमोर गाडीत बसून बँकेत गेले. त्याचवेळी दत्तात्रय भरणे यांचे सहकारी देखील त्यांच्याबरोबर होते, असा आरोप रंजन तावरे यांनी केला.

PDCC बँक सायंकाळी साडेपाच वाजता बंद होते. नंतर फोन आल्यामुळे मी बँकेत आलो. संगणकीय काम सुरू असल्याने काही कर्मचारी बँकेत थांबले होते. पण तिथे माळेगाव साखर कारखान्याच्या मतदार याद्या कशा आल्या हे मला माहिती नाही, अशा शब्दांमध्ये बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी कानावर हात ठेवले.

याच मुद्द्यावर शरद पवारांनी देखील आज भाष्य केले. लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी देखील बारामतीतली हीच PDCC बँक रात्री उघडली होती. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने ती दुसऱ्यांदा उघडली. बँकेचे नेतृत्व करणारे लोक कोण आहेत त्यांनी सूचना दिल्याशिवाय कर्मचारी बँक कशाला उघडेल? ती कोणी आणि कशासाठी उघडली होती?, याचा अर्थ काय समजायचा तो समजून घ्या, असे वक्तव्य शरद पवारांनी केले. जणूकाही आत्तापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत असला कुठला प्रकारच झाला नाही, असा आव शरद पवारांनी या निमित्ताने आणला. पण शेतकरी कर्जमुक्तीच्या नावाखाली पवारांनी असल्यास बँकांचा भरणा केला होता, जो नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रकारच्या राजकीय भांडवलीकरणासाठी “उपयोगी” ठरला होता.

त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने PDCC बँक रात्री 11.00 वाजता उघडणे हा प्रकार आज जरी उघडकीस आला असला तरी तो शेवटी “पवार संस्कारितांनीच” केलाय. साखर कारखान्यापासून ते लोकसभेपर्यंत निवडणुका कशा लढवायच्या ते पवारांनीच संबंधितांना शिकवलेय, ही बाब नजरेआड कशी करता येईल??

Bank manager’s hand in ear regarding Malegaon factory’s voter list

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात