• Download App
    जंगल सफरीला कोरोनाची झळ; बुलढाणा अभयारण्यात बंद करण्याचे आदेश । Ban on jungle safaris due to corona infection

    जंगल सफरीला कोरोनाची झळ; बुलढाणा अभयारण्यात बंद करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी

    बुलढाणा : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. आता मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांनी १० जानेवारीला आदेश काढून जंगल सफारीवर बंदी आणली आहे. Ban on jungle safaris due to corona infection

    या निर्णयामुळे हिवाळ्यात जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्यांचा हिरमोड झाला. बुलढाणा जिल्ह्यात तीन अभयारण्य आहे. त्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा, लोणार यांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. विशेष म्हणजे ज्ञानगंगा अभयारण्याकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. या ठिकाणी धरणात बोटिंगची देखील व्यवस्था आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक बेरोजगार युवकांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला. मागील लॉकडाऊनमुळे सर्वजण हैराण होते.

    आता कोरोनाचा ओमिक्रोनचे संसर्ग प्रमाण अधिक वाढत असल्याने माणसामुळे वन्य प्राण्यात या विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत जंगल सफारीवर बंदी आणण्यात आली आहे. ज्योति बॅनर्जी , मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांनी १० जानेवारीला याबाबतचे आदेश काढल्याची माहिती वन्यजीव विभागाचे आरएफओ चेतन राठोड यांनी दिली आहे . कोणतीही पूर्वसूचना नसल्याने अचानक आलेल्या या आदेशामुळे ज्या पर्यटकांनी जंगल सफारीसाठी बुकिंग केली होती त्यांना ती करता आली नाही.

    • जंगल सफरीला कोरोनाची झळ
    • बुलढाणा अभयारण्यात बंद करण्याचे आदेश
    • ज्ञानगंगा, अंबाबारवा, लोणार ही अभयारण्य आहेत
    • हिवाळ्यात सफरीला येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड
    • वन्य प्राण्यांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आदेश

    Ban on jungle safaris due to corona infection

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Mumbai Pune bomb : मुंबई-पुणे महापौर कार्यालय, RSS मुख्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने ई-मेल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

    Fadnavis : “काँग्रेसच्या नेतृत्वात शिखांचा कत्लेआम झाला, हे सत्य विसरता येणार नाही”; शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

    Shaktipitha Highway : रक्त सांडू, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही!; कोल्हापुरात विराट एल्गार, हजारो शेतकरी-महिलांचा सरकारविरोधात मोर्चा