औरंगाबाद: काँग्रेसकडून वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान ; दुपारी १२ पासून ठेवले ताटकळत ; नाना पटोले पोहोचले थेट रात्री ८ वाजता! ‘ना’ मास्क ‘ना’ सोशल डिस्टंसिंग!

औरंगाबादेत आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं.


कार्यक्रम सुरु होण्यास तब्बल पाच तासांचा उशीर झाल्यानं स्वातंत्र्य सैनिक कंटाळून निघून गेल्याचं पाहायला मिळालं.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून औरंगाबादेत आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्काराचंही आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, नाना पटोले रात्री ८ वाजता कार्यक्रम स्थळी पोहचले .दुपारी १२ पासून आलेले जेष्ठ वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक दुपारी ५ नंतर निघून गेले त्यांचा थातुर मातुर सत्कार पदाधिकार्यांनीच केला .कोरोना काळात वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांना अशा प्रकारे थांबवून ठेवणे हा एक प्रकारे त्यांचा अपमान असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. Aurangabad: Congress insults veteran freedom fighters; Kept in check since 12 noon; Nana Patole arrived directly at 8 pm! ‘No’ Mask ‘No’ Social Distancing!

कार्यक्रम सुरु होण्यास तब्बल पाच तासांचा उशीर

स्वातंत्र्य सैनिक कंटाळून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला जाणार होता. त्यासाठी दुपारी १२ पासून स्वातंत्र्यसैनिक कार्यक्रमस्थळी हजर झाले होते. मात्र, दुपारी ३ वाजचा सुरु होणाऱ्या कार्यक्रमासाठी नाना पटोले रात्री ५ पर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिक कंटाळून निघून गेले!



नाना पटोले यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाीच स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून स्वागत होताच नाना पटोले यांची वाट न पाहता वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक निघून गेले. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी कोरोना नियम धाब्यावर बसवल्याचं दिसून आलं. कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं, तर नाना पटोलेंसह अनेकांच्या तोंडावर मास्कही नव्हता. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांकडूनच कोरोना नियमावली पायदळी तुटवली जात असल्याचं चित्र औरंगाबादेत पुन्हा पाहायला मिळालं.

Aurangabad : Congress insults veteran freedom fighters; Kept in check since 12 noon; Nana Patole arrived directly at 8 pm! ‘No’ Mask ‘No’ Social Distancing!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात