विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केले, त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केले, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी हादरवणारी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणात आणखी तपास सुरू असून त्याची वेळोवेळी माहिती दिली जाईल, असही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.Ashok Kharat raped women by claiming to be a divine incarnation; Chief Minister Devendra Fadnavis’ shocking information in the Assembly
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले :
अशोक खरात प्रकरणात आरोपीने महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी मागितले होते. या प्रकरणात नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी नीरज जाधव याने एआय फोटो व्हायरल केला, नंतर डिलीट केला. त्यामुळे संबंधित महिलेला नीरज जाधवच्या विरोधात पुरावा देता आला नाही. परंतु या प्रकरणातील पीडित महिलांना विश्वासात घेऊन, त्यांचे समुपदेशन करून, कोणतीही ओळख सार्वजनिक न करता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून तपास सुरू आहे.
– नाशिक मधल्या सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तक्रार केली. या महिलेला गुंगीचे औषध देऊन, तिच्या नवऱ्याला मारून टाकेन अशी धमकी देत वारंवार बलात्कार करण्यात आला. अशोक खरात हा महिलांना संमोहित करायचा. विधीच्या नावाखाली त्यांच्या पोटावरून हात फिरवायचा, त्यांच्या योनीत बोट घालायचा. तीर्थाच्या नावाखाली त्यांना लघवी पाजायचा. तसेच आपण दैवी अवतार असल्याचं सांगत या प्ररकरणाची वाच्यता कुठे केल्यास दैवी कोप होईल, अशी धमकी द्यायचा.
– या गुन्ह्यांचा प्राथमिक तपास करत असताना 6 लाख रोकड, दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले. डीव्हीआर, रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे आणि फायर केलेली 5 काडतुसे मिळाली. त्यानुसार 17 मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात आली.
– या प्रकरणात आणखी काही पीडित महिलांची ओळख पटविण्यात आली, त्यांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यात तयार केले. पीडित महिलांचे फोटो, व्हिडीओ फेसबुक तसेच सोशल मीडियावरून डिलीट करायचे काम सुरू आहे.
– अशोक खरातची 33 एकर जमीन, फार्म हाऊस, आणि इतर ठिकाणी जमिनी, फ्लॅट, पनवेल येथील 40 गुंठे जमीन, मुलीच्या नावावर असलेला पुण्यातील फ्लॅट, सिन्नर येथे मंगल कार्यालय जप्त करण्यात आलं आहे. आतापर्यंत 40 कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. तसेच अशोक खरातच्या नातेवाईकांच्या नावावर असलेली मालमत्ता या संदर्भात चौकशी सुरु आहे.
– आरोपी अशोक खरातच्या शिवनिका संस्थानची चौकशी करण्यायत येत आहे. या प्रकरणातील पीडित आणि आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेले पुजारी आणि इतर लोकांचेही जबाब घेतले आहेत. 4 पीडित महिलांचे जबाब घेऊन 5 गुन्हे दाखल केले आहे.
Ashok Kharat raped women by claiming to be a divine incarnation; Chief Minister Devendra Fadnavis’ shocking information in the Assembly
महत्वाच्या बातम्या
- हल्ले तात्पुरते थांबवायच्या ट्रम्प यांच्या घोषणेवर इराणचा अविश्वास!!
- घरगुती गॅस सिलेंडर मधल्या गॅसच्या वजनात घट??; तसला कोणताही प्रस्ताव नाही, मोदी सरकारचा खुलासा!!
- WB Supplementary : बंगालमध्ये आज सप्लिमेंटरी मतदार यादी येण्याची शक्यता; 27 लाख मतदारांवर परिणाम
- तमिळ अस्मितेच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांची 12 % वर वाताहत!!