विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ashish Shelar भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्य सरकारमध्ये मंत्री झाल्यामुळे त्यांना आता बीसीसीआय खजिनदार पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. बीसीसीआय बोर्ड सोडणारे आशिष शेलार दुसरे पदाधिकारी ठरतील. याआधी जय शहा यांनी सचिव पदाचा राजीनामा दिला होता. जय शहा आता आयसीसीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे बीसीसीआयला नवीन सचिव आणि खजिनदाराची नेमणूक करावी लागणार आहे.Ashish Shelar
आशिष शेलार ऑक्टोबर 2022 पासून बीसीसीआयच्या खजिनदार पदावर कार्यरत होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून ते आमदार झाले. रविवार त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आशिष आता राज्य सरकारचा भाग झाले आहेत. त्यामुळे शेलारांना बीसीसीआयच्या ऑफीस ऑफ प्रॉफीट नियमानुसार हे पद सोडावे लागणार आहे. त्यामुळे हे पद रिक्त होणार आहे. आता नवीन खजिनदार नेमण्यासाठी बीसीसीआय निवडणूक घेणार की, अध्यक्ष रॉजर बिन्नी आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून दुसऱ्या पदाधिकाऱ्याकडे जबाबदारी सोपवणार हे पहावे लागणार आहे.
2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करताना कोणताही मंत्री किंवा लोकप्रतिनिधी बीसीसीआयचा सदस्य होऊ शकत नाही, असा निर्णय दिला होता. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला सप्टेंबर 2022 मध्ये त्यांच्या घटनेत दुरुस्ती करण्याची परवानगी दिली होती, ज्यामुळे आमदारांना बोर्डावर पदाधिकारी बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यानंतर त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये शेलार बीसीसीआयचे कोषाध्यक्ष झाले होते.
आशिष शेलार हे बीसीसीआयच्या पदावरून पायउतार होणारे दुसरे पदाधिकारी आहेत. यापूर्वी, जय शाह यांनी बीसीसीआय सचिव पदाचा राजीनामा दिला होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष बनले होते. शाह यांनी 1 डिसेंबर रोजी आयसीसीमध्ये त्यांचा कार्यकाळ सुरू केला होता, तर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी 9 डिसेंबर रोजी संयुक्त सचिव देवजित सैकिया यांना बोर्डाचे अंतरिम सचिव म्हणून नियुक्त केले होते. सैकिया सप्टेंबर 2025 पर्यंत बीसीसीआयचे अंतरिम सचिव म्हणून त्यांच्या नवीन भूमिकेत राहतील. त्यानंतर हे पद कायमस्वरूपी भरले जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App