‘’…नाही तर लहानपणीचा खेळ.. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल “गाणी” असं म्हणत टोलाही लगावला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना(ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शेलारांनी विविध मुद्य्यांवरून उद्धव ठाकरेंना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे. Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray challenging him to clarify his position on various issues
आशिष शेलार आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘’महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन ‘उबाठा’ला थेट विचारतोय… औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर?, उस्मानाबाद की धाराशिव?, अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर?, काँग्रेस की हिंदुत्व?, कबर की स्मारक? आणि औरंगजेब की सावरकर?’’
याचबरोबर, ‘’ शब्दांची कोटी न करता.. मर्द, खंजीर… असले शब्द न वापरता… उबाठा प्रमुखांनी महाराष्ट्राला स्पष्ट शब्दात सांगावे. यापैकी नेमके काय? की दोन्ही? नाही तर लहानपणीचा खेळ.. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल ‘गाणी’ ‘’ असं म्हणत शेलारांनी टोलाही लगावला आहे.
याशिवाय, ‘’औरंगजेबाशी आपुलकी जपणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आहे, हे स्पष्ट आहे.’’ असंही आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App