विशेष प्रतिनिधी
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर राष्ट्रध्वज लावला होता. त्याच्यावर आर्टवर्क करण्यात आले होते. राष्ट्रध्वजाचा अवमान असल्याचा आरोप करीत मनसे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. अखेर तो हटविण्यात आला आहे.Artwork of the national flag; MNS aggressive; at last removed
१ ते ३० नोव्हेंबर मतदार पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. त्याच्या जनजागृतीसाठी हा राष्ट्रध्वज लावला होता. त्याच्यावर आर्टवर्क करण्यात आले होते. राष्ट्रध्वजाचा अवमान असल्याचा आरोप करीत मनसे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलिस या प्रकरणी चौकशी करीत आहे. मात्र तातडीने तो राष्ट्रध्वज हटविण्यात आला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तो पर्यंत मनसे मागे हटणार नाही असा निर्णय मनसे कार्यकऱ्यांनी घेतला असून आता या प्रकरणात पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App