पत्नीच्या त्रासाला कंटाळून लष्करातील जवानाची आत्महत्या

पत्नीच्या त्रासामुळे लष्करातील जवानाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पत्नी तसेच सासरच्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. Army soldier commits suicide due to wife’s harassment


विशेष प्रतिनिधी

पुणे : पत्नीच्या त्रासामुळे लष्करातील जवानाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पत्नी तसेच सासरच्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, सध्या.रा. सैनिक आवास, वानवडी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. शेलार लष्कराच्या वैद्यकीय रुग्णालयात नियुक्तीस होते. त्यांनी चार दिवसांपूर्वी सैनिक आवासातील खोलीत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. शेलार यांचा भाऊ केशव नानाभाऊ शेलार यांनी यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शेलार यांची पत्नी अश्विनी आणि   सासरच्यांवरगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेलार यांचा गेल्या वर्षी अश्विनी पाटीलशी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. अश्विनीने शेलार यांना त्रास देऊन कौटुंबिक हिंसाचार कायद्यावन्ये  गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. तिच्या धमकी तसेच त्रासामुळे शेलार यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे भाऊ केशव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Army soldier commits suicide due to wife’s harassment

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात