नवी मुंबईत घर : सिडकोच्या घरांसाठी “येथे” करा ऑनलाईन अर्ज!!

प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत सामान्यांना घर घेणे परवडत नाही त्यामुळे मुंबईजवळ असलेल्या नवी मुंबई भागात घर घेण्याकडे सर्वसामान्यांचा नागरिकांचा कल असतो. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोची ४ हजार १५८ घरे, २४५ गाळे आणि ६ कार्यालयांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरू झालेली आहे. नवी मुंबईत द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघरमध्ये ही घरे आहेत. ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणार आहेत. Apply online for CIDCO houses here

सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज

सिडको मेगालॉटरी काढणार असून यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सिडकोची सदनिका तसेच व्यावयासिक गाळे, भूखंडाची मेगालॉटरी आहे. सिडकोने ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी ग्राहकांना आज १ सप्टेंबरपासून अर्ज करता येणार आहे.

कुठे कराल अर्ज?

सिडकोच्या घरांसाठी नागरिकांनी https://www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. अर्ज करण्यापासून ते सोडतीपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून पूर्ण होणार असल्याचे सिडकोने सांगितले आहे. ४ हजार १५८ घरांपैकी ४०४ घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असतील.

सिडकोप्रमाणेच आता म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेत आता बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार यापुढे आता म्हाडाची प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन स्वरुपात पूर्ण होईल. यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन जमा करावी लागणार आहेत.

Apply online for CIDCO houses here

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात