Anil Deshmukh : अनिल देशमुख तुरुंगात खांद्यावर पडून रुग्णालयात दाखल; सीबीआयचा ताबा लांबणीवर!!


प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट आणि बार चालकांकडून शंभर कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याच्या प्रकरणात सध्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगात चालत असताना खांद्यावर पडले त्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेAnil Deshmukh: Anil Deshmukh hospitalized after falling on his shoulder; CBI’s stay on suspension !!

त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र या खांद्यावर पडण्याच्या या प्रकारामुळे देशमुख यांचे सीबीआय ताब्यात जाणे काही काळ लांबले आहे. मात्र, त्यांच्याबरोबरचे सचिन वाजे संजीव पलांडे कुंदन शिंदे या आरोपींना सीबीआय ताब्यात घेणार आहे.



अनिल देशमुख हे शुक्रवारी तुरुंगात चालत असताना पडले आणि त्यामुळे त्यांच्या खांद्याला मार लागला. सध्या देशमुखांना उपाचारांसाठी जे. जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. 1 एप्रिल रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते. याआधी, 100 कोटींच्या वसुली आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली त्यांना ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक केली होती.

जे जे रुग्णालयामध्ये दाखल

अनिल देशमुखांना उपचारांसाठी शुक्रवारीच जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख तुरूंगामधील बाथरूममध्ये घसरून पडले. तेव्हापासून ते रुग्णालयात आहेत. आज त्यांचा MRI काढण्यात आला आहे.

चालत असताना पडले आणि त्यामुळे त्यांचा खांदा डिसलोकेट झाला आहे. त्यामुळे त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.अनिल देशमुख जरी खांद्यावर पडले असले तरी सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना सीबीआय ताब्यात घेणार आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी पत्रातून केला होता.तर काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Anil Deshmukh: Anil Deshmukh hospitalized after falling on his shoulder; CBI’s stay on suspension !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात