• Download App
    Amit Shah : अमित शाह आज महाराष्ट्रात!आज प्रवरानगर-सहकार परिषद-शिर्डी दर्शन;उद्या पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निवासस्थानी भेट। Amit Shah: Amit Shah in Maharashtra today! Pravaranagar-Sahakar Parishad-Shirdi Darshan today; Visit at the residence of Shivshahir Babasaheb Purandare in Pune tomorrow

    Amit Shah : अमित शाह आज महाराष्ट्रात!आज प्रवरानगर-सहकार परिषद-शिर्डी दर्शन;उद्या पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निवासस्थानी भेट

    • भाजपच्या दिग्गज नेत्यांची सहकार परिषदेला उपस्थिती
    • केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
    • अमित शाहांच्या उपस्थितीत सहकार परिषद व शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
    • गृहमंत्री अमित शाह 19 डिसेंबर रोजी पुण्यात CFSL च्या नवीन इमारतीचे उद्घाटन करतील आणि NDRF जवानांसोबत जेवण करतील. 
    • दुपारी ते वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहतील आणि पुणे महापालिकेतील मराठा योद्धा छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करतील.

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून म्हणजेच १८ डिसेंबरपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते पुण्यातील केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (CFSL) नवीन इमारतीचे उद्घाटन करतील आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) जवानांशी संवाद साधतील. आज प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. अमित शाहांच्या उपस्थितीत सहकार परिषद व शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. Amit Shah: Amit Shah in Maharashtra today! Pravaranagar-Sahakar Parishad-Shirdi Darshan today; Visit at the residence of Shivshahir Babasaheb Purandare in Pune tomorrow

    माजी विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड , चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती असणार आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रथमच अमित शाह यांचा हा दौरा आहे. अमित शाह साई दर्शनासाठी साई दरबारी हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.



    सहकाराच्या मायभूमीत अमित शाहंची उपस्थिती-

    केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह दोन दिवस शिर्डी आणि पुणे दौऱ्यावर असतील. अमित शाह आज शिर्डीत येणार असून साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. यानंतर अमित शाह सहकार परिषदेला उपस्थित राहतील. सहकराची सुरूवात झालेल्या प्रवरा येथे देशाची पहिली सहकार परिषदेत होणार असून विचारमंथनही होणार आहे.

    त्यांच्या दौऱ्यादरम्यान, गृहमंत्री अमित शहा पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला आणि मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) च्या राष्ट्रीय पुरस्कार समारंभालाही उपस्थित राहणार आहेत.

    सहकार मंत्री झाल्यावर अमित शाह पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आली. अमित शाह यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गृहमंत्री संध्याकाळी पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची भेट घेतील, त्यानंतर ते प्रख्यात इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी भेट देतील.

    Amit Shah: Amit Shah in Maharashtra today! Pravaranagar-Sahakar Parishad-Shirdi Darshan today; Visit at the residence of Shivshahir Babasaheb Purandare in Pune tomorrow

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!