• Download App
    अजितनिष्ठांनी खोटे दस्तावेज देऊन खोटा वाद निर्माण केला; निवडणूक आयोगात शरदनिष्ठांचा युक्तिवाद Ajitnishtha created a false dispute by giving false documents

    अजितनिष्ठांनी खोटे दस्तावेज देऊन खोटा वाद निर्माण केला; निवडणूक आयोगात शरदनिष्ठांचा युक्तिवाद

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अजितनिष्ठांनी निवडणूक आयोगात खोटे दस्तावेज सादर करून राष्ट्रवादीतला खोटा वाद निर्माण केला, असा मुख्य युक्तिवाद शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे मुख्य वकील अभिषेक मनू सिंघवी आयोगात केला. शरद पवारांसह स्वतः अभिषेक मनू सिंघवी हे निवडणूक आयोगात युक्तिवाद करायला हजर होते. या युक्तिवादानंतर त्यांनी शरद पवारांसमवेत पत्रकारांसमोर शरदनिष्ठ राष्ट्रवादीची बाजू मांडली. Ajitnishtha created a false dispute by giving false documents

    अजितनिष्ठांच्या अर्जावर अर्जाला आधार मानून निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद असल्याचा निर्वाळा दिला हा निर्वाळा चुकीचा असल्याचा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला, पण तो युक्तिवाद निवडणूक आयोगाने मान्य केला नाही, पण त्याचवेळी शरदनिष्ठ गटाचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन निर्णय देण्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले, असे अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.

    यावेळी अभिषेक मनू सिंघवी यांनी अजितनिष्ठ राष्ट्रवादीवर खूप गंभीर आरोप केला. अजितनिष्ठांनी खोटे दस्तावेज निवडणूक आयोगात सादर केले. अनेकांची प्रतिज्ञापत्र खोटी आहेत. अनेकांना आपण सह्या केल्याचे माहितीच नाही. काही लोकांच्या सह्या आहेत पण ते माणसे मृत आहेत किंवा अस्तित्वातच नाहीत. अनेक जणांच्या दस्तऐवजी दस्तावेजांवरील पत्ते एका ठिकाणचे असून ते प्रत्यक्षात हजारो मैल दूर राहतात, असे दस्तावेजांमध्ये अनेक घोटाळे आहेत, हे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले, असा दावा अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.

    अजितनिष्ठांनी निवडणूक आयोगामध्ये पक्षाच्या संस्थापकालाच नाकारण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने फक्त आमदार, खासदार यांची संख्या मोजावी. त्यांना त्यांच्या मतदारसंघात मिळालेली मते मोजावीत आणि मगच खरी राष्ट्रवादी कोणाची याचा निर्णय द्यावा, असा युक्तिवाद अजितनिष्ठांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणीत केल्याचा दावा अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.

    पण मूळात अजितनिष्ठांचे वर उल्लेख केलेले सर्व निकषच चुकीचे आहेत. कारण ते पक्षाचा संस्थापक, पक्षाची घटना आणि पक्षाची रचना या तिन्ही गोष्टींकडे हेतूत: दुर्लक्ष करीत आहेत. पक्षाचे संस्थापक शरद पवार आहेत. त्यांनी पक्षाची रचना घडविली आहे. घटना तयार केली आहे आणि त्या घटनेनुसारच पक्ष चालवत आहेत. याविषयीचा सविस्तर युक्तिवाद आम्ही निवडणूक आयोगात करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाला निर्णय देण्याची विनंती करणार आहोत, असे अभिषेक मनू सिंघवी यांनी स्पष्ट केले.

    Ajitnishtha created a false dispute by giving false documents

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस