प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सहकार्यवाह मदनदास देवी यांचे काल बंगलोर मध्ये निधन झाले. त्यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मोतीबागेत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तेथे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची देखील भेट घेतली. Ajitdada along with the Chief Minister at Moti Bagh for the funeral of Madandas Devi
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मदनदास देवी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी डॉ. मोहन भागवत आणि दत्तात्रय होसबळे यांच्याशी काही मिनिटे बातचीत केली. या निमित्ताने अजित पवार प्रथमच पुण्यातल्या मोतीबाग या संघ कार्यालयात गेल्याचे दिसले. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हेही होते.
राष्ट्र समर्पित जीवनाची अखेर
मदनदास देवी (वय ८१ वर्षे) यांचे सोमवारी पहाटे बंगळुरू मध्ये निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मदनदास देवी यांच्या निधनानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी शोकसंदेश पाठविला. मदनदासजी यांच्या जाण्याने आमचा ज्येष्ठ सहकारी गमावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शारीरिक अस्वास्थ्याशी त्यांचा संघर्ष सुरू होता. आज पहाटे त्यांच्या या संघर्षाचा आपल्या सर्वांसाठी अत्यंत दुःखद अंत झाला. मदनदास देवी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघ योजनेतून देण्यात आलेले पहिले प्रचारक होते. अनेक वर्षे त्यांनी परिषदेचे संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. स्वर्गीय यशवंतराव केळकरजी यांच्या सहवासात त्यांनी संघटनकलेच्या गुणवत्तेला परिपूर्ण रूप दिले, असे या संदेशात म्हटले आहे.
राष्ट्र सेवेसाठी समर्पित जीवन
मदनदासजी देवी यांचा जन्म 9 जुलै रोजी झाला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे त्यांचे मूळ गाव. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात त्यांनी 1959 मध्ये प्रवेश घेतला. एम. कॉमनंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली. राष्ट्रीय स्तरावर रँक मिळवत त्यांनी सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण केली.
पुण्यात शिक्षण घेत असतानाच वरिष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेने त्यांचा रा. स्व. संघाशी संबंध आला. मदनदास देवी यांनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. आयुष्यातील जवळपास 70 वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून सह सरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला. ते 1969 पासून संघ प्रचारक होते. अभाविपमध्ये त्यांनी 1975 पासून कामास सुरूवात केली. तेथे ते विभाग, प्रदेश व क्षेत्रीय अशा जबाबदाऱ्यांनंतर त्यांनी अ.भा. संघटन मंत्री म्हणूनही काम केले. महाविद्यालय- शहर पातळीवर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील यासाठी विशेष लक्ष देत त्यांनी संघटनकार्याचा पाया रचला. अनेक समर्पित कार्यकर्त्यांच्या पिढ्या त्यांनी घडविल्या.
पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे, की श्री. मदनदास देवीजी यांच्या देहावसानामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. त्यांच्याशी माझे केवळ घनिष्ठ संबंधच नव्हते, तर त्यांच्याकडून मला खूप काही शिकायलाही मिळाले. दुःखाच्या या प्रसंगी ईश्वर सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देवो. ओम शांति!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more