नाशिक :Ajit Pawar पुण्यातील जैन होस्टेल जमीन व्यवहाराचा विषय तापून थंड होतोय नाही, तोच अजित पवारांच्या मुलाचा जमीन खरेदीतला भ्रष्टाचार समोर आला. पण त्यामुळेच महार वतन जमीन खरेदीत भ्रष्टाचार अजितदादांचा आणि आरोपांचे शिंतोडे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर!!, असला प्रकार घडलाAjit Pawar’s son corruption, but allegations on Devendra fadnavis government
पुण्यातील जैन होस्टेल जमीन व्यवहाराचा विषय केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना चांगलाच राजकीय दणका देऊन गेला. 230 कोटी रुपयांचा तो व्यवहार रद्द करावा लागला. मुरलीधर मोहोळ त्या प्रकरणात चांगलेच अडचणीत आले. शेवटी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप करून तो व्यवहार रद्द झाल्यानंतर ते चांगले तापलेले प्रकरण थंडावले.Ajit Pawar
– 1800 कोटींची जमीन 300 कोटी रुपयांना
पण भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेल्या अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीने 1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी रुपयांना घेतली आणि त्यावर फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली. फक्त 24 दिवसांमध्ये व्यवहार झाला. महार वतनाची जमीन खरेदी करून तिच्यावर आयटी पार्क उभारायचा डाव रचला गेला, असा आरोप विधान परिषदेतले माजी विरोधी पक्ष नेते आणि ठाकरे सेनेचे मराठवाड्यातले नेते अंबादास दानवे यांनी केला. त्यांनी सोशल मीडिया वर सविस्तर पोस्ट केली. त्याची सुरुवातच “मेवाभाऊंच्या राज्यात” या शब्दांनी केली. त्यामुळे अजितदादांच्या मुलाने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची शिंतोडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर उडाले.
– अजितदादांचा सिंचन घोटाळा
देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कारकिर्दीत असे कुठलेही आरोप झाले तरी त्यांना सहज चिकटले नव्हते. खुद्द त्यांनीच विरोधी पक्षनेते असताना अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात रान उठविले होते. त्यांच्याच प्रदेशाध्यक्ष पदाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात त्यावेळी भाजपचे सरकार आले होते आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री बनले होते. परंतु, त्यांच्या सरकारमध्ये सिंचन घोटाळ्याच्या चौकशीला फारसा वेळ येऊ शकला नव्हता. परंतु त्यानंतर तर फारच मोठ्या घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादीशी अपवादात्मक सुद्धा युती नाही असे त्रिवार सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीशी युती करणे भाग पडले त्यामध्ये त्यांच्या इच्छेपेक्षा केंद्रीय नेतृत्वाचा वरचष्मा राहिला.
मेवाभाऊंच्या राज्यात… १८०० कोटींची जमीन ३०० कोटींत खरेदी,स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये! उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली.… — Ambadas Danve (@iambadasdanve) November 5, 2025
मेवाभाऊंच्या राज्यात…
१८०० कोटींची जमीन ३०० कोटींत खरेदी,स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये!
उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली.…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 5, 2025
– पृथ्वीराज चव्हाणांना जावे लागले…
पण त्यामुळेच आता अजित पवारांच्या मुलाच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे शिंतोडे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर आले. सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचे शिंतोडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारवर उडाले होते. त्या आरोपांची राळ देवेंद्र फडणवीस यांनीच उडविली होती त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार गेले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदावरून गेले. पण त्यानंतरही अजित पवार फक्त पाच वर्षे विरोधी बाकांवर बसले आणि त्यानंतरच्या प्रत्येक सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिले. आता अजित पवारांच्या मुलाच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे शिंतोडे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर उडाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App