विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या अवैध भोंग्यांविरुद्ध आवाज उठवल्यानंतर अखेर “भोंगा” उतरला…!! पण थांबा… उतरलेला “भोंगा” तो मशिदींवरला नव्हे, तर थिएटर मधला आहे…!! After Raj Thackeray raised his voice against illegal loudspeaker on mosques, the loudspeaker finally came down
राज ठाकरे यांनी अवैध भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवला त्याचा फटका राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा “भोंगा”ला बसला आहे. “भोंगा” सिनेमा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 3 मे रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा मनसे नेते आणि चित्रपट निर्माते अमेय खोपकर यांनी केली होती.
राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वतः गृहखातंच सांगतंय. — Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022
राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वतः गृहखातंच सांगतंय.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022
परंतु आधी “भोंगा” सिनेमाला थिएटर्स मिळू दिली नाहीत. नंतर थिएटर मिळाली, तर प्राईम टाईम मिळाला नाही आणि आता प्राईमटाईम ऐवजी “भोंगा” सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करायचा तर तो सिनेमा पोलिसच थिएटर मध्ये लावू देत नाहीत. स्वतः अमेय खोपकर यांनी वेगवेगळी ट्विट करून महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारवर हा आरोप केला आहे. सरकार हुकुमशहा असल्यासारखे वागत आहे. “भोंगा” सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करू देत नाहीत. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तो सिनेमा प्रदर्शित होत नाही, असे शरसंधान अमेय खोपकर यांनी ट्विट मधून साधले आहे.
राज ठाकरे यांच्या अटकेची शक्यता आहे. त्यामुळे मनसैनिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. ठाकरे – पवार सरकार महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मनसैनिकांची धरपकड करत आहे. तब्बल 13 हजार मनसैनिकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. एकीकडे ही कारवाई सुरू असताना दुसरीकडे “भोंगा” हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊ दिला जात नाही. त्यामुळे मनसैनिकांनी बरोबरच सिनेमाप्रेमींमध्ये देखील प्रचंड अस्वस्थता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App