विशेष प्रतिनिधी
हिंगोली : मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन तूर व इतर पिके धोक्यात आले होते त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.After 20 days of rest Rain in Hingoli district
परंतु काल रात्री हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव,अजेगांव आडोळ व इतर काही भागात चांगला पाऊस कोसळल्याने पिकांना पुन्हा एकदा जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे व तसेच आजही हिंगोली जिल्ह्यावर ढगाळ वातावरणाचे सावट असल्याचे दिसून येत आहे
पावसाच्या उघडापी मुळे सोयाबीन तूर व इतर पिके सुकत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता परंतु सध्या काही भागात पाऊस कोसळल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे मात्र अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App