Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले यांचा आवाज वापरून अभिनेता आमिर खानची फसवणूक; शाहूपुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल

Udayanraje Bhosale

विशेष प्रतिनिधी

पुणे : Udayanraje Bhosale साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या आवाजाची नक्कल करून बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव अली अमानत शेख असे असून, तो पुण्याचा रहिवासी आहे.Udayanraje Bhosale

अली शेख हा स्वतःला उदयनराजे भोसले  ( Udayanraje Bhosale ) असल्याचे भासवत लोकांना आमिर खानकडे पाठवत होता. “माझे काही लोक आपल्याला भेटायला येतील, त्यांना मदत करा,” अशा प्रकारचे कॉल आमिर खान यांना केला जात होता. हा प्रकार जानेवारी २०२५ पासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.Udayanraje Bhosale



या संपूर्ण प्रकरणाची शंका आमिर खान यांच्या टीमला आल्यावर त्यांनी उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय पंकज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. पंकज चव्हाण यांनी जेव्हा आरोपीला स्वतः फोन करून विचारणा केली, तेव्हा त्यालाही आरोपीने आपण उदयनराजे बोलतोय, असे सांगितले. त्यामुळे प्रकरणाचा खरा स्वरूप उघडकीस आले.

त्यानंतर अली अमानत शेख याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Actor Aamir Khan cheated using Udayanraje Bhosale’s voice; Shahupuri police files case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात