• Download App
    Abhijit Dipke राहुल गांधींशी स्पर्धेत उतरला अभिजीत दिपके; पण कशासाठी??

    राहुल गांधींशी स्पर्धेत उतरला अभिजीत दिपके; पण कशासाठी??

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : कॉकरोच जनता पार्टीचा म्होरक्या अभिजीत दिपके आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या स्पर्धेत उतरला. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्याच पद्धतीने अभिजीत दिपके याने अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. Abhijit Dipke

    नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, पण त्याचे श्रेय कॉकरोच जनता पार्टीला मिळाल्याने राहुल गांधींनी अमित शाह यांना टार्गेट केले. राहुल गांधींनी विद्यार्थी आंदोलनात न झालेल्या गोळीबाराला अमित शाह यांना परस्पर जबाबदार धरून‌ राहुल गांधींनी त्यांचा राजीनामा मागितला. पण आता अभिजीत दिपके याने राहुल गांधींच्या स्पर्धेत उतरून अमित शाह यांचा राजीनामा मागितला.

    • अभिजित दिपकेचे वक्तव्य :

    विद्यार्थी आंदोलनात मुलांवर जो गोळीबार झाला, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. कॉकरोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येतेय असे जर सरकार म्हणत असेल तर हे त्यांचं फेल्युअर आहे. तुम्ही सत्तेत असताना आम्हाला फंडिंग कसे झाले??, मग ते कसले चाणक्य??



    नवे केंद्रीय शिक्षणमंत्री आहेत, ते अत्याचाराचे समर्थन करतात. धर्मेंद्र प्रधानांना पदावरून काढून आणखी एक विचित्र माणूस पदावर बसवला. यांच्याकडे सगळेच लोक तसे आहेत. त्यांच्याकडे पर्याय काय आहे?? जेन झी ला ट्रोल करून काय मिळणार?? हीच मुले उद्या देश चालवणार. ही मुले सामान्य घरातली आहेत. मी स्वतः शेतकरी घरातून आलो आहे. जेव्हा जेव्हा गरज असेल, तेव्हा तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत उभे राहू.

    ऑफर आली तरी मी भाजपमध्ये नाही जाणार

    मला कितीही वेळा भाजपकडून ऑफर आली, तरी मी भाजपमध्ये जाणार नाही. मला धमक्या येतायत की भाजपमध्ये या, तुमच्यासाठी चांगले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या नातवाच्या वयाच्या लोकांना धमकावत आहेत, त्यांना लाज वाटायला पाहिजे. कोणत्याही एका माणसाला मोठं करू नये. 2014 साली एक माणूस सत्तेत आला आणि तेव्हापासून देशात बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्नांवर कुणीच बोलत नाही.

    आम्ही आंदोलन केलं तेव्हा आमच्यावर 24 तास कॅमेरे होते. पोलिसांचे, मीडियाचे सगळेच कॅमेरे होते. आता पोलिसांनी जर कॅमेरापासून घाबरण्याची एसओपी बनवली असेल, तर त्यांची चूक असेल. पोलिसांनी एकतर संविधान फॉलो करावं, नाहीतर खाकी पँट काढून, मग खाकी चड्डी घालावी आणि भाजपच्या मुख्यालयाच्या समोर घोषणाबाजी करावी. आंदोलनाच्या आधीच पाहिलं होते, दगडांनी भरलेला ट्रक आणू ठेवला होता, हे मी स्वत: पाहिले. दगडांनी भरलेला ट्रक मुख्य दिल्लीत आला कसा? एक फुटलेली व्हॅन उभी करायची. हा सगळा पोलिसांचा आधीपासूनचा प्लॅन होता की नंतर विद्यार्थ्यांवर उलटवायचं!!

    Abhijit Dipke has entered the fray against Rahul Gandhi—but for what?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Hridaynath Mangeshkar : राज्य शासनाचे प्रतिष्ठेचे चित्रपट पुरस्कार जाहीर; पं. हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान यांना जीवनगौरव; प्रसाद ओक यांचाही सन्मान

    FDA Action : खासगी आस्थापनांवरच कारवाई का? तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे, मंत्र्यांच्या आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश

    Rohit Pawar : ‘NEET’ फेरपरीक्षेचाही पेपर फुटला? आमदार रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, गुजरातमधून 3 दिवस आधीच पेपर फुटल्याचा दावा