• Download App
    Devendra Fadnavis तब्बल १४००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा; त्यांच्याकडून पैसे करणार वसूल; मुख्यमंत्र्यांचा दणका!!

    तब्बल १४००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा; त्यांच्याकडून पैसे करणार वसूल; मुख्यमंत्र्यांचा दणका!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात तब्बल 14 हजार पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला त्यामुळे त्यांच्याकडून पैसे वसूल करणारच!!, असा दणका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. Devendra Fadnavis

    महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेवरून राजकीय रणकंदन माजले असताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसह गैरफायदा घेणाऱ्या 14 हजार पुरुषांना सुद्धा दणका दिला.

    महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिला अपात्र झाल्याच्या बातम्या सगळीकडे पसरल्यानंतर त्यावरून मोठा राजकीय गदारोळ झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारने महिलांना फसविल्याचा आरोप केला. आमदार जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या आरोपाला दुजोरा दिला.



    – सुप्रिया सुळे, जयंत पाटलांचे आरोप खोडले

    पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळी आकडेवारी देऊन या संदर्भात स्पष्ट खुलासा केला. त्यांनी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांचे आरोप परखड शब्दांमध्ये खोडून काढले. पण त्या पलीकडे जाऊन लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या 14 हजार पुरुषांना पैसे वसूलच करणार, अशा शब्दांमध्ये दणका दिला.

    – केवायसी न केलेल्या महिला अपात्र

    लाडकी बहीण योजना सुरू करताना सर्व कायदेशीर निकष लावलेच होते. त्यानुसारच लाडक्या बहिणींचे अर्ज दाखल करून घेतले होते त्यांना लाभ द्यायला सुरुवात केली होती. पण नंतर सगळ्यांकडे संबंधित कागदपत्रे मागितली केवायसी करायला सांगितले त्यावेळी मात्र गेल्या नऊ महिन्यांमध्ये अनेकांनी केवायसी केली नाही. त्यामुळे 60 ते 80 लाख महिला अपात्र ठरल्या. पण त्यांच्यापैकी आजही कुणी केवायसी करायला तयार असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ निश्चित मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

    – एक कोटी 70 लाख महिलांना योजनेचा आजही फायदा

    महाराष्ट्रात आज एक कोटी 70 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो आहे. कारण त्यांनी केवायसी पूर्ण केली त्यांना इथून पुढे सुद्धा या योजनेचा लाभ मिळतच राहील. ज्या बहिणींनी गेल्या नऊ महिन्यांमध्ये योजनेचा लाभ घेतला पण केवायसी केली नाही त्यांच्याकडून पैसे वसूल करणार नाही. पण महाराष्ट्रात तब्बल 14 हजार पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतला, त्या सगळ्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करू, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

    A staggering 14,000 men took undue advantage of the ‘Ladki Bahin’ scheme. Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्या कंपनीचे अनधिकृत बांधकाम पाडले

    Sunil Tatkare : पार्थ पवारांच्या सक्रियतेचे तटकरे यांनी केले स्वागत; अजितदादांच्या निधनापूर्वीच राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा झाल्याचा दावा

    Maharashtra Govt : मराठा आंदोलनातील मृत वारसांना MIDC मध्ये नोकरी:राज्य सरकारचा शासन निर्णय जारी, जिल्हाधिकाऱ्यांना पडताळणीचे आदेश