विशेष प्रतिनिधी
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या भुसावळमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात नगराध्यक्षांसह २१ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.21 corporators including Bhusawal mayor join NCP
सावदा आणि फैजपूर, बोदवड येथील नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जळगाव दौऱ्यावर असून भुसावळ येथील विविध शासकीय योजनांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर भुसावळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्यासाठी भुसावळ तालुका व यावल, बोदवड, मुक्ताईनगर जळगाव या ठिकाणचे कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत समिती सदस्य ,आदी मान्यवरांनी राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जळगाव जिल्ह्यामध्ये बळकटी निर्माण झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App