विशेष प्रतिनिधी
पुणे – हडपसर परिसरातील हिंगणेमळा येथे कॅनालच्या परिसरातून एक अडीच वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी हडपसर पाेलीस ठाण्यात दाखल केली हाेती. मात्र, पाेलीसांच्या तपासा दरम्यान सदर मुलीचा मृतदेह साेमवारी सकाळी यवत येथे कॅनालच्या पाण्यात मिळून आला आहे. 2.5 yrs old girl body found in yavat, her parents registered missing complent yesterday
त्रिशिका ऊर्फ तान्ही विजय खुडे असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत विजय सुखाराम खुडे (वय-३२) यांनी पाेलीसांकडे तक्रार दिली आहे. २० मार्च राेजी सकाळी मुलीची आई मुलीसह हिंगणेमळा येथे कॅनालवर धुणे धुण्याकरिता गेली हाेती. त्यावेळी मुलगी खेळत असताना अचानक ती कॅनालच्या पाण्यात पडली आणि वाहून गेली.
मात्र, याबाबतची कल्पना आईला नसल्याने ती मुलीचा शाेध घेऊनही तिला मुलगी मिळून न आल्याने याबाबत तिने पाेलीसांकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली हाेती. मुलीस पालकांचे कायदेशीर रखवालीतून अज्ञाताने फुस लावुन पळवुन नेले अशी नाेंद पाेलीसांनी करुन घेतली. त्यानंतर पाेलीसांनी शाेधाशाेध करत घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, मुलगी कॅनालच्या पाण्यात पडल्याचे दिसून आले अशी माहिती हडपसरचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अरविंद गाेकुळे यांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App