वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात दीड कोटी नागरिकांनी कोरोनाविरोधी लसीचा पहिला डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. लसीकरणासाठी पुढाकाराचा अभाव आणि लसीकरणाचा मंदावलेला वेग या दोन गोष्टी त्यासाठी कारणीभूत असल्याचे चित्र आहे. 1.5 crore citizens away From the first dose of anti-corona vaccine; Vaccination slowed down
कोरोनाची दुसरी लाट ओसरताच अनेकांनी धोका टळला म्हणून लासीकरणाकडे पाठ फिरविली आहे. दुसरीकडे ओमीक्रोनचे संकट निर्माण झाले आहे. सुमारे१ कोटी ४१ लाख नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही.
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १३ लाख ८३ हजार नागरिक पहिल्या डोस पासून वंचित असल्याची माहिती उघड झाली आहे. त्या पाठोपाठ नाशिक, जळगाव, नगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. नोव्हेंबरला लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी कमी झाली. परंतु डिसेंबरमध्ये ओमीक्रॉनच्या भीतीने पुन्हा लसीकरणासाठी गर्दी वाढत आहे. जानेवारीपासून सुरू झालेल्या या लसीकरण मोहिमेत सर्वाधिक दैनंदिन सरासरी लसीकरण डिसेंबरमध्ये झाले आहे. या काळात रोज सरासरी ८ लाख ७९ हजार नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणाचा वेग वाढला असला तरी अजूनही राज्यात १५ टक्के नागरिकांना पहिला डोस देणे बाकी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App