भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये तब्बल 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत असल्याचेही सांगितले आहे.
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन: गुगल गुजरातमध्ये त्यांचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन्स सेंटर उघडणार आहे, अशी घोषणा कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर केली. मोदी सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या प्रमुख मोहिमेसाठी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचेही त्यांनी कौतुक केले. We are announcing the opening of our global fintech operation centre in GIFT City Gujarat Google CEO Sundar Pichai
वृत्तसंस्था एएनआयने सुंदर पिचाईच्या हवाल्याने म्हटले आहे की, “पंतप्रधान मोदींना त्यांच्या ऐतिहासिक यूएस दौऱ्यात भेटणे हा सन्मानाचा विषय होता. आम्ही पंतप्रधान मोदींसोबत शेअर केले की Google भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. आम्ही गुजरातमध्ये आमचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन्स सेंटर उघडण्याची घोषणा करत आहोत.”
गुगलचे सीईओ म्हणाले, “डिजिटल इंडियासाठी पंतप्रधानांचे व्हिजन वेळेच्या आधीचे होते आणि मी आता याला एक ब्लू प्रिंट म्हणून पाहतोय. जे इतर देश करू पाहत आहेत.”
#WATCH | Google CEO Sundar Pichai after meeting PM Modi, says "It was an honour to meet PM Modi during the historic visit to the US. We shared with the Prime Minister that Google is investing $10 billion in India's digitisation fund. We are announcing the opening of our global… pic.twitter.com/ri42wI3Adv — ANI (@ANI) June 23, 2023
#WATCH | Google CEO Sundar Pichai after meeting PM Modi, says "It was an honour to meet PM Modi during the historic visit to the US. We shared with the Prime Minister that Google is investing $10 billion in India's digitisation fund. We are announcing the opening of our global… pic.twitter.com/ri42wI3Adv
— ANI (@ANI) June 23, 2023
पिचाई व्यतिरिक्त, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक हे देखील शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार्या व्यावसायिकांमध्ये होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App