पाकिस्तानात धर्मांधांचा पुन्हा उच्छाद : धर्मांधांनी गणपती मंदिराची केली तोडफोड, मूर्तीही केली ध्वस्त; व्हिडिओ व्हायरल होऊनही स्थानिक सरकारचे मौन

Pakistan Ganesh Temple Attack Video Viral Rahim Yar Khan Mandir Vandalised By Mob In Pakistan Bhong Town

Pakistan Ganesh Temple Attack : कट्टरपंथीयांनी पुन्हा एकदा पाकिस्तानातील मंदिराला लक्ष्य केले आहे. ताजे प्रकरण पाकमधील पंजाबच्या भोंग शहरातील आहे. धार्मिक कट्टरपंथीयांनी भरदिवसा स्थानिक गणपती मंदिराला लक्ष्य केले. मंदिर तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना कसे ठेचले जात आहे, त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. Pakistan Ganesh Temple Attack Video Viral Rahim Yar Khan Mandir Vandalised By Mob In Pakistan Bhong Town


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : कट्टरपंथीयांनी पुन्हा एकदा पाकिस्तानातील मंदिराला लक्ष्य केले आहे. ताजे प्रकरण पाकमधील पंजाबच्या भोंग शहरातील आहे. धार्मिक कट्टरपंथीयांनी भरदिवसा स्थानिक गणपती मंदिराला लक्ष्य केले. मंदिर तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना कसे ठेचले जात आहे, त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे.

मूर्तींची तोडफोड

कट्टरपंथीयांनी मंदिरात विध्वंस केला. त्यांनी मूर्ती फोडण्यासही मागेपुढे पाहिले नाही. झुंबर आणि काचेची सजावटही फोडली. मंदिरावरील या हल्ल्यानंतर स्थानिक हिंदूंमध्ये प्रचंड संताप आहे. असे असूनही स्थानिक प्रशासन हे प्रकरण लपवण्यात व्यग्र आहे. आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. व्हिडिओमध्ये सर्व हल्लेखोरांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत.

पीटीआयकडून हल्ल्याचा निषेध

इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते आणि हिंदू पंचायतीचे संरक्षक जय कुमार धिरानी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले, ‘जिल्ह्यातील भोंग शरीफमधील मंदिरावरील या भयंकर हल्ल्याचा तीव्र निषेध. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानविरुद्धचा कट आहे. मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की, दोषींना तुरुंगात टाकावे.

अल्पसंख्याकांवर हल्ले वाढले

अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये कट्टरपंथीयांकडून हल्ले वाढले आहेत. हिंदू मुलींच्या अपहरणाच्या घटना सामान्य झाल्या आहेत, विशेषतः कोरोना महामारी आणि लॉकडाऊनदरम्यान मुलींचे अपहरण करून अतिरेक्यांनी त्यांच्या वयाच्या दुप्पट मुसलमानांशी जबरदस्तीने लग्न लावले. तोंड उघडल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते.

1947 मध्ये पाकिस्तानमध्ये 428 मोठी मंदिरे होती

अखिल पाकिस्तान हिंदू हक्क चळवळीच्या सर्वेक्षणानुसार, फाळणीच्या वेळी शेजारच्या देशात एकूण 428 मोठी मंदिरे होती. हळूहळू त्यांची संख्या कमी होत गेली. मंदिराच्या जमिनी जप्त करण्यात आल्या. दुकाने, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, कार्यालये, सरकारी शाळा किंवा मदरसे उघडण्यात आले. आज परिस्थिती अशी आहे की, येथे फक्त 20 मोठी मंदिरे शिल्लक आहेत.

पाकमध्ये 3 टक्क्यांहून कमी हिंदू उरले

फाळणीच्या वेळी पाकिस्तानात हिंदूंची लोकसंख्या 15 टक्के होती. सरकारच्या दडपशाही धोरणांमुळे आणि कट्टरवाद्यांच्या हल्ल्यांमुळे हा आकडा कमी होत गेला. जबरदस्तीने धर्मपरिवर्तन हे सर्वात मोठे कारण आहे. जे हिंदू शिल्लक आहेत त्यांना कट्टरवाद्यांकडून सतत हल्ल्यांना सामोरे जावे लागते. आज परिस्थिती अशी आहे की, हिंदू लोकसंख्येच्या 3 टक्क्यांपेक्षा कमी लोक इथे उरले आहेत.

Pakistan Ganesh Temple Attack Video Viral Rahim Yar Khan Mandir Vandalised By Mob In Pakistan Bhong Town

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात