विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – वॉशिंग्टन डीसी येथील ‘स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट’च्या बोर्डावर ईशा अंबानीची नियुक्ती करण्यात आली. ईशा अंबानी या बोर्डाच्या सर्वात तरुण सदस्य आहेत. त्यांची बोर्डावर ४ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.Isha Ambani elected on Smithsonium Musiuam
त्यांनी येल युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधून पदव्या घेतल्या आहेत आणि न्यूयॉर्क शहरातील मॅकिन्से अँड कंपनीमध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून काम केले आहे.ईशा अंबानीशिवाय कॅरोलिन ब्रेहम आणि पीटर किमेलमन यांचीही बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे.
१७ सदस्यीय मंडळात अमेरिकेचे उपाध्यक्ष, अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश, अमेरिकी सिनेटचे तीन सदस्य आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे तीन सदस्य असतात. ‘स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट’च्या निवेदनात ईशा अंबानीच्या व्यक्तिमत्त्वाचा संदर्भ देत भारतातील डिजिटल क्रांतीचे नेते म्हणून त्यांचे वर्णन केले आहे. त्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या संचालक आहेत. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक आणणाऱ्या टीमचा ती एक भाग होती. ज्याने फेसबुकचा ५.७ अब्ज डॉलरचा करार केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App