China’s Oldest Person : अबब तब्बल तीन शतकांच्या साक्षीदार! चीनच्या सर्वात वयोवृद्ध महिलेचे 135 व्या वर्षी निधन…

  • चीनमध्ये कोमस्करिक हे असे शहर आहे ज्या शहरात सर्वाधिक 90 वर्षांवरील लोक राहतात.
  • या शहरात सरकारद्वारे 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना मोफत डॉक्टर सेवा, वार्षिक शारीरिक तपासणी आणि मासिक सबसिडी आदी दिली जाते.

वृत्तसंस्था

बिजिंग : चीनमधील सर्वात वयोवृद्ध महिला अलीमिहान सेयती यांचे 135 व्या वर्षी निधन झाले. अलीमिहान यांनी एक दोन नाही तर तीन शतके पाहिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. चीनच्या प्रसिद्धी विभागानुसार काशगर प्रांतात शुले काऊंटीच्या कोमक्सरिक टाऊनशिपमध्ये त्या राहत होत्या . त्यांचा जन्म 25 जून 1886 मध्ये झाला होता. China’s Oldest Person: Abbab witnessed three centuries! China’s oldest woman dies at 135

चीनची वृत्तसंस्था शिन्हुआनुसार 2013 मध्ये ‘चाइना एसोसिएशन ऑफ गेरोंटोलॉजी अँड जेरियाट्रिक्स’ ने जारी केलेल्या यादीनुसार अलीमिहानचे नाव सर्वात वर होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. मृत्यूपर्यंत त्यांचे आयुष्य नेहमीसारखे होते, वेळेवर जेवणे, अंगनात सूर्यप्रकाश घेणे आदी कामे त्या करत होत्या.



चीनमध्ये कोमस्करिक हे असे शहर आहे ज्या शहरात सर्वाधिक 90 वर्षांवरील लोक राहतात. या शहरात सरकारद्वारे 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना डॉक्टर सेवा, वार्षिक शारीरिक तपासणी आणि मासिक सबसिडी आदी दिली जाते.

China’s Oldest Person: Abbab witnessed three centuries! China’s oldest woman dies at 135

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub