WATCH : काबूल विमानतळ स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ, रक्ताचे वाहिले पाट, चहुकडे विखुरले मृतदेह, 110 जणांचा मृत्यू

watch video Of Kabul Airport Attack Bodies scattered all around drain full of blood

watch video Of Kabul Airport Attack % काबूल विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यात 110 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन अधिकारी आणि अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात 28 तालिबानी अतिरेकीही ठार झाले आहेत. हा हल्ला एवढा भयंकर होता की प्रत्येकजण स्तब्ध झाला. हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात एक नाला दिसतो. हा नाला मृतदेहांनी भरलेला आहे आणि त्याचे पाणीदेखील रक्तामुळे लाल झाले आहे, जणू तो ‘रक्ताचा पाट’ आहे. watch video Of Kabul Airport Attack Bodies scattered all around drain full of blood


वृत्तसंस्था

काबूल : काबूल विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यात 110 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 150 हून अधिक जखमी झाले आहेत. अमेरिकन अधिकारी आणि अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात 28 तालिबानी अतिरेकीही ठार झाले आहेत. हा हल्ला एवढा भयंकर होता की प्रत्येकजण स्तब्ध झाला. हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात एक नाला दिसतो. हा नाला मृतदेहांनी भरलेला आहे आणि त्याचे पाणीदेखील रक्तामुळे लाल झाले आहे, जणू तो ‘रक्ताचा पाट’ आहे.

https://twitter.com/bsarwary/status/1430914150935449602?s=20

मृत आणि जखमींनी भरलेल्या या नाल्यात लोक एकमेकांना मदत करताना दिसले. हा व्हिडिओ काबूल विमानतळावरील हल्ल्यानंतरचा असल्याचा दावा ट्विटरवर करण्यात आला आहे. या स्फोटात अनेकांचे अख्खे कुटुंब संपले. तेथील अनेक मृतदेहदेखील बेवारस आहेत, त्यांचे अंत्यसंस्कार यंत्रणेवर अवलंबून आहेत. अशी व्यवस्था जी आता अफगाणिस्तानातून संपुष्टात आली आहे.

या हल्ल्याची जबाबदार इसिस के या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हा हल्ला होण्याची गुप्तचर विभागाने आधीच अमेरिकी सैन्याला दिली होती. तरीसुद्धा हा हल्ला झाला. इसिसच्या दहशतवाद्याने स्वत:च्या अंगावर स्फोट घडवून हा हल्ला केला होता. आता अमेरिकेनेही इसिसवर कारवाई करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती दिली जात आहे.

watch video Of Kabul Airport Attack Bodies scattered all around drain full of blood

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात