Donald Trump : ‘व्हाईट हाऊसम’ध्ये खळबळ! अमेरिकेच्या संघीय न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का

Donald Trump

टॅरिफ निर्णय रद्द केला; जाणून घ्या, आता व्हाईट हाऊसने काय घेतली आहे भूमिका?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Donald Trump अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ ऑर्डर रद्द केला आहे, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. फेडरल कोर्टाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पाच प्रमुख टॅरिफ कार्यकारी आदेश बेकायदेशीर आणि असंवैधानिक घोषित केले आहेत.Donald Trump

कोर्टाने म्हटले आहे की, या आदेशांनुसार लादलेले टॅरिफ राष्ट्राध्यक्षांच्या अधिकाराबाहेर होते आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेसची मान्यता आवश्यक होती. फेडरल कोर्टाच्या या निर्णयावर व्हाईट हाऊस नाराज आहे.



व्हाईट हाऊसने या निर्णयाला ‘स्पष्टपणे चुकीचे’ म्हटले आहे आणि त्याविरुद्ध अपील करण्याची योजना आखली आहे. अमेरिकन न्यायालयाच्या या निर्णयामुळे ट्रम्पच्या ट्रेड वॉरमध्ये अडकलेल्या जगातील सर्व देशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देताना म्हटले आहे, की ट्रम्प प्रशासनाने १९७७ च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याचा (IEEPA) गैरवापर करून मोठ्या प्रमाणात शुल्क लादले होते, जे राष्ट्राध्यक्षांच्या घटनात्मक अधिकारांच्या पलीकडे होते. व्यापार तूट ‘असामान्य आणि असाधारण धोका’ मानण्याचा ट्रम्प प्रशासनाचा युक्तिवाद कायदेशीररित्या न्याय्य नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जगातील सर्व देशांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले असले तरी, व्हाईट हाऊसला मोठा धक्का बसला आहे.

US federal court overturns US President Donald Trump’s tariff order

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात