‘एफबीआय’ने या घटनेचा तपास सुरू केला आहे.
विशेष प्रतिनिधी
सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेने रविवारी (२ जुलै) सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात खलिस्तान समर्थकांनी केलेल्या जाळपोळीच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. खलिस्तानी कट्टरपंथीयांनी पहाटे दीड ते अडीच या वेळेत भारतीय वाणिज्य दूतावासाला आग लावण्याचा प्रयत्न केला, पण सॅन फ्रान्सिस्को अग्निशमन विभागाने तातडीने आग विझवली, अशी माहिती अमेरिकेतील स्थानिक वृत्तवाहिनी दिया टीव्हीने दिली आहे. United States A group of Khalistan radicals on July 2 set Indian Consulate on fire in San Francisco
आगीमुळे दूतावासाचे फारसे नुकसान झाले नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर सुदैवाने या घटनेत एकाही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही. खलिस्तान समर्थकांनी या घटनेचा व्हिडिओही जारी केला आहे.
United States | A group of Khalistan radicals on July 2 set Indian Consulate on fire in San Francisco. The fire was suppressed quickly by the San Francisco Fire Department. No major damages or staffers were harmed. Local, state and federal authorities have been notified. The US… pic.twitter.com/uhx9NtML5G — ANI (@ANI) July 4, 2023
United States | A group of Khalistan radicals on July 2 set Indian Consulate on fire in San Francisco. The fire was suppressed quickly by the San Francisco Fire Department. No major damages or staffers were harmed. Local, state and federal authorities have been notified. The US… pic.twitter.com/uhx9NtML5G
— ANI (@ANI) July 4, 2023
सिख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने ८ जुलैपासून परदेशातील भारतीय दूतावासांना घेराव घालण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे. एफबीआयने या घटनेचा तपास सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App