फ्री बलुचिस्तान मुव्हमेंटने (एफबीएम) पाकिस्तानी अत्याचाराविरोधात निषेध म्हणून ब्रिटीश संसदेसमोर निदर्शने केली. ब्रिटनमधील बलुच कार्यकर्ते आणि एफबीएम सदस्यांनी या निषेधात भाग घेतला. बलुचींविरोधात पाकिस्तानकडून चालू असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाची माहिती देण्यात आली.आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे.The movement of Balochistan movement against Pakistani atrocities in front of the British Parliament
विशेष प्रतिनिधी
लंडन: फ्री बलुचिस्तान मुव्हमेंटने (एफबीएम) पाकिस्तानी अत्याचाराविरोधात निषेध म्हणून ब्रिटीश संसदेसमोर निदर्शने केली. ब्रिटनमधील बलुच कार्यकर्ते आणि एफबीएम सदस्यांनी या निषेधात भाग घेतला. बलुचींविरोधात पाकिस्तानकडून चालू असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाची माहिती देण्यात आली.आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे.
दहशतवादी पाकिस्तानला पाठिंबा देणे थांबवा अशी मागणी करण्यात आली.पाकिस्तानात हजारो बलुचींचे अपहरण केले गेले आहे. बेकायदेशीरपणे पाकिस्तानी लष्कराच्या छळ केंद्रात कोणत्याही गुन्ह्याशिवाय ठेवण्यात आले आहे. अपहरण केलेल्यांचा अमानुष छळ केला जात आहे, असा आरोपही करण्यात आला.
पाकिस्तानी लष्कर बेकायदेशीरपणे बलुची नागरिकांना ताब्यात घेतले जाते. त्यांना कोणतीही कायदेशिर मदत मिळून दिली जात नाही. कुटूंबियांशी संपर्क साधण्याची परवानगीही नाही. बेपत्ता बलुची नागरिकांच्या कुटुंबियांनाही त्रास दिला जातो.
मानवी हक्कांची विटंबना करणारी आणि भयानक वागणूक संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार मानवतेविरुध्द गुन्ह्यांत येते. पाकिस्तानकडून बलूच लोकांचा होणारा नरसंहार रोखण्यासाठी मदत करण्याची विनंती बलुचिस्तान चळवळीतील कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत जगाला आणि पाश्चात्य लोकशाहींना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App